ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तुकडेबंदी कायद्यात अडकलेल्या कमी क्षेत्राच्या जमिनींचे व्यवहार नियमित होणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. Transactions involving small land parcels affected by the Prevention of Fragmentation Act will be regularized; major relief for farmers.

तुकडेबंदी कायद्यात अडकलेल्या कमी क्षेत्राच्या जमिनींचे व्यवहार नियमित होणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा.

Transactions involving small land parcels affected by the Prevention of Fragmentation Act will be regularized; major relief for farmers.
Transactions involving small land parcels affected by the Prevention of Fragmentation Act will be regularized; major relief for farmers.

परंडा दि. ९ (रंगोली न्यूज) – Transactions involving small land parcels affected by the Prevention of Fragmentation Act will be regularized; major relief for farmers. महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायद्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कमी क्षेत्राच्या जमिनींच्या व्यवहारांना नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याचा परंडा तालुक्यातील शेकडो जमीनधारकांना मोठा फायदा होणार आहे.

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, परंडा यांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत १, २ किंवा ५ गुंठे अशा कमी क्षेत्राच्या जमिनींचे व्यवहार झाले असतील आणि संबंधित जमीन गावठाण हद्दीपासून ५०० मीटरच्या परिसरात असेल, तर अशा व्यवहारांचे नियमितीकरण करण्यात येणार आहे.

तुकडेबंदी कायद्याच्या अटींमुळे अनेक ठिकाणी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदणीकृत दस्ताऐवजाद्वारे झाले असले तरी फेरफार नोंदी मंजूर झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक खरेदीदारांची नावे सातबारा उताऱ्यावर मालकी हक्काने नोंदली गेली नसून प्रकरणे प्रलंबित राहिली होती.

याशिवाय, स्टॅम्प पेपर किंवा नोटरीवर झालेले परंतु नोंदणीकृत नसलेले व्यवहारही या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहेत. अशा व्यवहारांची प्रथम नोंदणी करून त्यानंतर फेरफार नोंदीची कार्यवाही केली जाणार आहे.

या निर्णयामुळे परंडा तालुक्यातील अनेक वर्षांपासून अडकलेल्या जमीन व्यवहारांना कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून संबंधितांना मालकी हक्काच्या नोंदी नियमित करता येणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार निलेश काकडे यांनी केले आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments