ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कमांडो करिअर अकॅडमीत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या हस्ते अग्निवीरांचा सत्कार. Shivrajyabhishek ceremony celebrated with enthusiasm at Commando Career Academy; 'Agniveers' felicitated by Deputy Superintendent of Police Amol Mohite.

कमांडो करिअर अकॅडमीत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या हस्ते अग्निवीरांचा सत्कार.

Shivrajyabhishek ceremony celebrated with enthusiasm at Commando Career Academy; 'Agniveers' felicitated by Deputy Superintendent of Police Amol Mohite.
Shivrajyabhishek ceremony celebrated with enthusiasm at Commando Career Academy; 'Agniveers' felicitated by Deputy Superintendent of Police Amol Mohite.

परंडा दि. ७ (रंगोली न्यूज) – Shivrajyabhishek ceremony celebrated with enthusiasm at Commando Career Academy; 'Agniveers' felicitated by Deputy Superintendent of Police Amol Mohite. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त परंडा येथील कमांडो करिअर अकॅडमीमध्ये भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रम, शौर्य आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अभिवादन केले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि सेवाभावाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कमांडो करिअर अकॅडमीचे संचालक महावीर तणपुरे व संचालिका भाग्यश्री तणपुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच अकॅडमीमधून भारतीय सैन्यातील अग्निवीर योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमास माजी सैनिक बंडू घोगरे, मधुकर बिडवे, समाधान देवकर, देविदास भराठे, संतोष सूर्यवंशी, मेजर भोसले यांच्यासह अमर बंडू घोगरे, वैभव यादव, शंभूराजे नागटिळक, भुजंग गंगथडे, कृष्णा दराडे, कृष्णा वाघमारे, पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, धैर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. कठोर परिश्रम, सातत्य आणि शिस्त यांच्या बळावर युवकांनी सैन्य, पोलीस व इतर सेवाक्षेत्रात यश मिळवावे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या हस्ते अग्निवीर म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments