शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
![]() |
| Tribute paid to Chhatrapati Shivaji Maharaj at Paranda on the occasion of the Shivrajyabhishek ceremony. |
परंडा दि. ६ (रंगोली न्यूज) – Tribute paid to Chhatrapati Shivaji Maharaj at Paranda on the occasion of the Shivrajyabhishek ceremony. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
दि. ६ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परंडा शहरासह तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराजांच्या कार्याचा व स्वराज्य स्थापनेच्या महान इतिहासाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमानंतर उपस्थित शिवभक्तांना मिठाईचे वाटप करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंडा शहर व तालुक्यातील समस्त शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या सोहळ्यात सहभाग नोंदविला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!