LCB ची कारवाई! पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त.
![]() |
| LCB Action! Wind turbine cable theft racket busted. |
परंडा दि. ६ (रांगोली न्यूज) — LCB Action! Wind turbine cable theft racket busted. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने पवनचक्कीच्या विद्युतवाहिनीच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मांडवा शिवारात केलेल्या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, चोरीच्या तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या तारा, एक पिकअप वाहन व दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पवनचक्की तार चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मंडवा शिवारात काही इसम येरमाळा व वाशी परिसरातील पवनचक्क्यांवरील नवीन विद्युतवाहिनीची अॅल्युमिनियमची तार चोरी करून पिकअप वाहनात भरत आहेत.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तेथे एक पिकअप व दोन मोटारसायकली उभ्या असल्याचे, तसेच सुमारे ८ ते १० इसम पिकअपमध्ये तारांचे बंडल टाकत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी पाच जणांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये श्याम अजिनाथ शिंदे (वय २६, रा. मंडवा), लाला गोविंद पवार (वय २४, रा. जुनी दूध डेअरी, धाराशिव, ह.मु. मांडवा), आकाश श्रीरंग पवार (रा. वरुडा, ता. जि. धाराशिव), पवन कालीदास काळे (वय २२, रा. वरुडा, ता. जि. धाराशिव) आणि पिकअप चालक अंगद प्रल्हाद शिंदे (वय ३२, रा. घोसापुरी, ता. जि. बीड) यांचा समावेश आहे. याशिवाय घटनास्थळावरून पळून गेलेल्या अन्य चार इसमांची नावेही पोलिसांना सांगण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी तेरखेडा, इंदापूर व ढोकी परिसरातील पवनचक्कीच्या नवीन पोलवरील लाईन कट करून तार चोरी केल्याची माहिती दिली. तसेच चोरीच्या तारा धाराशिव येथील जाकेर निजाम शेख याला विकल्याचे समोर आले. पोलिसांनी जाकेर निजाम शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आरोपींकडून चोरीच्या तारा घेतल्याचे सांगितले.
या कारवाईनंतर आरोपींना व चोरीचा माल खरेदी करणाऱ्यास येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणून तांब्याची तार, अॅल्युमिनियमची तार, पिकअप वाहन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा नळदुर्ग पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
कारवाईत पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच क्यूआरटी पथकातील आदित्य बालवाड, रितेश चारले, महेश खरात, महेबुब अरब, सुभाष चौरे, रोहित दंडनाईक व प्रकाश बोईनवाड यांचा सहभाग होता.
पवनचक्कीच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील तार चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!