ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री गार भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रंजीत माने; उपाध्यक्षपदी उमेश सोनवणे. नवरात्रोत्सवाच्या नियोजनाला सुरुवात; धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी नव्या कार्यकारिणीवर. Planning begins for the Paranda Shri Gar Bhavani Navratri Festival.

श्री गार भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रंजीत माने; उपाध्यक्षपदी उमेश सोनवणे.

नवरात्रोत्सवाच्या नियोजनाला सुरुवात; धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी नव्या कार्यकारिणीवर.

Planning begins for the Paranda Shri Gar Bhavani Navratri Festival.
Planning begins for the Paranda Shri Gar Bhavani Navratri Festival.

परंडा दि. ६ (रंगोली न्यूज) — Planning begins for the Paranda Shri Gar Bhavani Navratri Festival. परंडा शहराचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री गार भवानी मंदिरातील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाला सुरुवात झाली असून, श्री गार भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रंजीत माने, तर उपाध्यक्षपदी उमेश सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गार भवानी मंदिराच्या सभागृहात झालेल्या बैठकीत मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

श्री गार भवानी मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा नवरात्रोत्सव दि. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, नऊ दिवसांच्या या उत्सवात परंडा शहरासह परिसरातील हजारो भाविक श्री गार भवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. विशेषतः महिला भाविकांची मोठी उपस्थिती या काळात पाहायला मिळते.

नवरात्रोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन व्यवस्था, मंदिर परिसरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, शिस्तबद्ध नियोजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यासाठी मंडळाकडून नियोजन करण्यात येणार आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी नवनियुक्त कार्यकारिणीवर सोपविण्यात आली आहे.

नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, भक्तीभाव आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा उत्सव ठरावा, यासाठी विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी, युवक, महिला व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.

नवनियुक्त कार्यकारिणी

अध्यक्ष : रंजीत माने, उपाध्यक्ष : उमेश सोनवणे, सचिव : गोविंद शिंदे, सहसचिव : नागेश गोंजारे, खजिनदार : कृष्णा चौधरी, सहखजिनदार : गणेश तांबिले, कार्याध्यक्ष : विलास शिंदे, यल्लप्पा काळे

कार्यकारिणी सदस्य

बिभिषण जाधव, आप्पा जाधव, अण्णा कोकरे, बबलू पवार, बाळराजे माकणीकर, दत्ता मेहेर, अभिजीत जाधव, कृष्णा खंकाळ, रमजान शेख, रशीद शेख, संजय दणाने, प्रेम खंकाळ, सोमनाथ खंकाळ, दादा माने, आनंद महाजन, योगेश माने, रोहित माने, धनराज जाधव, शिवा खंकाळ, विनोद महाजन, भारत जाधव, अमित ठाकूर, सार्थक मेहेर, दशरथ शिंदे, महेश घोरपडे, आदी जाधव, योगीराज सोनवणे, बापू शिंदे, बंटी जाधव, प्रथमेश मागणीकर, भूषण महाजन, वसंत घोरपडे, सोमा शिंदे, अजय कदम, गणेश कदम, बंटी सोनवणे, सोनू सोनवणे, शाकीर शेख, बबलू शिंदे, आनंद बनसोडे, दादा कसबे, अमित बनसोडे, दत्ता सोनवणे, गुलाम पठाण, विश्वास बनसोडे, खाजा लांडगे, शिवाजी सोनवणे, अरुण कानडे (भाऊजी), प्रकाश सोनवणे, अविनाश चौतमाल, विनोद साळवे, अनिकेत जाधव, दत्ता सोनमुखे, दिनेश तांबिले, बालाजी सोनवणे, अमर बनसोडे, दीपक बनसोडे, मनोज बनसोडे, बाळा लोकरे, नागनाथ शिंदे, दत्ता शिंदे, जगदीश शिंदे, कृष्णा पवार, हर्षल मेहर, प्रेम खंकाळ, बापू सरक, सोमनाथ बंडू शिंदे, विजय लिमकर, भाऊराव मदने, बबन जाधव, सुभाष मारकड, जगन्नाथ पाढुळे, पंकज बनसोडे, दत्ता लोकरे, सागर शिंदे, राजाभाऊ माने, आजिनाथ माने, राजाभाऊ लामकणे, बबलू जाधव, सोनू तेली, गणेश जमदाडे, दिलीप खंबायत, दत्ता कोयले, रामलिंग गायकवाड, सलीम शेख, मदन मोरे, श्रीमंत शिंदे, अमू शिंदे आदींचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

श्री गार भवानी मातेच्या नवरात्रोत्सवासाठी शहरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यंदाचा उत्सव भक्तिभाव, सामाजिक सलोखा आणि विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळाने तयारी सुरू केली आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments