ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

डोमगावचे माजी सरपंच मधुकरराव मिस्किन यांचे निधन. Madhukarrao Miskin, former Sarpanch of Domgaon, passes away.

डोमगावचे माजी सरपंच मधुकरराव मिस्किन यांचे निधन.

Madhukarrao Miskin, former Sarpanch of Domgaon, passes away.

Madhukarrao Miskin, former Sarpanch of Domgaon, passes away.
परंडा - रंगोली न्युज दि. २३) परंडा तालुक्यातील डोमगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी सरपंच मधुकर बाबुराव मिस्किन (वय ८८) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. गांधी-नेहरू विचारांचा वारसा जपणारे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने परंडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

     मधुकरराव मिस्किन हे त्या काळातील बी.ए. पदवीधर होते. शिक्षणाची ओढ आणि समाजकार्याची आवड यामुळे त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतःचा ठसा उमटवला. १९७७ ते १९८२ या काळात त्यांनी डोमगावचे सरपंच पद भूषवले. त्यांच्याच कार्यकाळात डोमगावमध्ये पहिल्यांदा वीज (विद्युतीकरण) आली होती, ज्यामुळे गावच्या विकासाला नवी गती मिळाली.

     राजकारणात सक्रिय असूनही त्यांना शेती आणि भजनाची विशेष आवड होती. विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे राजकीय वर्तुळात त्यांना आदराचे स्थान होते. आपल्या निगर्वी आणि अभ्यासू वृत्तीने त्यांनी अनेक दशके समाजकारण केले.

    त्यांच्या पश्चात पत्नी कुसुम, दोन मुले - संजय मिस्किन (प्रसिद्ध पत्रकार, मुंबईतील राजकीय विश्लेषक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माध्यम सल्लागार) व राजेंद्र मिस्किन (प्रगतशील बागायतदार शेतकरी), सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

       मिस्किन कुटुंबाच्या या दुःखात परंडा तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments