सदगुरू यज्ञेश्वर (वेडे महाराज) यांच्या पुण्यतिथी निमित्त उज्जैयिनी पिठ जगदगुरूंची उपस्थिती. ...
Presence of Jagadguru of Ujjain Peeth on the occasion of the death anniversary of Sadguru Yajneshwar परंडा दि. १) परंडा येथील सदगुरू यज्ञेश्वर शिवाचार्य (वेडे महाराज) यांच्या २२६ व्या पुण्यतिथी निमित्त सदगुरू राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा या पुण्य नगरीमध्ये येथे उज्जैयीनी सधर्म पीठ (कर्नाटक) जगदगुरु यांची उपस्थिती लाभणार असून अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य ग्रंथाचे पारायण, संगीतमय शिवपाठ, किर्तन भजन,रथोत्सव,धर्मसभा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.
परंपरे प्रमाणे येथील भोत्रा रोड मठात वेडे महाराज यांची २२६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. यात बुधवार दि. ४ मार्च २०२६ ते शनिवार ७ मार्च २०२६ या कालावधीत विविध भक्तीमय कार्यक्रम होणार असून यात ४ ते ६ मार्च दरम्यान किर्तन भजन शिवपाठ महाप्रसाद जागर तर दि. ७ मार्च शनिवार रोजी पुण्यतिथी दिवशी सकाळी ८ ते ११ श्री श्री श्री १००८ जगदगुरु सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैयिनी सधर्म (कर्नाटक) यांचा भव्य दिव्य रथोत्सव छत्रपती शिवाजी चौक ते वेडे महाराज मठ भोत्रा रोड पर्यंत होणार असून नंतर धर्मसभा होणार आहे. सकाळी ८ वाजता गुरुगादीस रुद्राभिषेक बिल्वार्चन महापुजा व महाप्रसाद होणार आहे. या अभुतपुर्व सोहळ्यासाठी श्री वेदांताचार्य मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज (वेळापुर), सिध्दलिंग राज गुरु शिवाचार्य महाराज (शिंगणापूर), डॉ निळकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर), शिवानंद शिवाचार्य महाराज (वाळवा), वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज (वसमत), प्रभुदेव शिवाचार्य महाराज (माढा), वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज (मानुर), महादय्या रविशंकर शिवाचार्य महाराज(रायपाटण), आदी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसाराचा लाभ घ्यावा असे आवाहन परंडा शहर व ग्रामस्थ शिष्य परिवार यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com



0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!