पशुवैद्यकीय दवाखाने आता सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत राहणार सुरू. ....
![]() |
| Veterinary clinics will now remain open from 8 am to 5 pm. |
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून कृत्रिम रेतन, कृत्रिम रेतनाद्वारे जन्मलेली वासरे, गर्भधारणा तपासणी, व्यंधत्व निवारण उपचार, लसीकरण, औषधोपचार व शस्त्रक्रिया अशा तांत्रिक सेवेमध्ये मोठी घट, पशुधनाची उत्पादन क्षमता कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामीण रोजगार निर्मिती व स्वयंरोजगार निर्माण करणे यामध्ये घट होणे. त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती व स्वयंरोजगार वाढविणे हे शासनाचे धोरण असून त्यासाठी पशुवैद्यकीय चिकित्सालय फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय यांच्या कामकाजाच्या वेळेमध्ये सुधारणा करून आता सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते १.३० व सायंकाळी ३ ते ५ वाजेपर्यंत व शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वा. तसेच पशुपालकांना अकस्मिक प्रसंगी २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
शेतकरी आपल्या शेतातील कामकाज करत सोबतीला पशुपालन करत असतात. त्यामध्ये दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांच्या आर्थीक उत्पादनात भर घालनारा व्यवसाय आहे. कुटुंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो. आपल्या कुटुंबातील गरजा भागविण्यासाठी पशुपालन व दुग्ध व्यवसाय हे मोठे साधन आहे. त्या अनुषंघाने शसनाने पशुवैद्यकीय चिकित्सालय अधीकारी, कर्मचारी यांना वरील कामकाज वेळेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.
पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे पशुरूग्ण यांची तपासणी व उपचार करणे हे नियमित कामकाज असल्याने वरील कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आकस्मिक प्रसंगी पशुपालकांना २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय चिकित्सालय कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक सात दिवसातुन किमान १ वेळ वेळ भेट देणे आवश्यक आहे. तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी यांनी ग्रामसभेला उपस्थित राहणे व त्यामधून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे, शासनाच्या विविध योजनांचे ग्रामस्थ सभेमध्ये वाचन करणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा ग्रामस्थांना व पशुपालकांना मोठा फायदा व माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!