परंडा येथे धाराशिव जिल्हा विज्ञान शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
जिल्हापरिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण.
![]() |
| Dharashiv District Science Teachers' Awards Distribution Ceremony Concluded at Paranda. |
रंगोली न्युज - परंडा दि. ३)
धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील बावची विद्यालय, परंडा येथे दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, धाराशिव (संलग्न महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महासंघ) यांच्या वतीने “डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार २०२६” “Dr. C.V. Raman District-Level Science Teacher Award 2026” वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
धाराशिव जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्काराच वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव चे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे उपस्थित होते. तर या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी जिप. सभापती श्रीमती अर्चनाताई जाधव, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, पंचायत समिती साहाय्यक गटविकास अधिकारी रविंद्र जाधव नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, पं.स. सदस्य अमोल जगताप, जि.प. सदस्या सौ. वैशालीताई डोके, रेवन ढोरे यांच्यासह विशेष उपस्थितीमध्ये ॲड. सुभाष मोरे, रवी नरहीरे, बिभिषण रोडगे, संतोष माळी आदी मान्यवरांची उपस्थित होते.
पुरस्काराचे माणकरी :-
कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट विज्ञान शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये १) श्रीमती पूनम गौतम चेडे, जे.आय.आर. टी. तंत्र प्रशाला, वाशी, २) केशव काशिनाथ बनजगोळे, श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव, ३) सदाशिव विठ्ठल डिगुळे, जय स्वामी नारायण विद्यालय, समद्राळ, ता. उमरगा, ४) मकरंद चनबस पाटील, जवाहर विद्यालय, अणदुर, ता. तुळजापूर, ५) संजय शिवाजीराव पाटील, श्रीराम हायस्कूल, पाचपिंपळा, ता. परंडा, ६) बिभीषण दगडू शिंदे, जगदंबा कन्या प्रशाला, खामसवाडी, ता. कळंब, ७) श्रीमती पद्मिनी वसंतराव कवडे, भगवंत विद्यालय, हाडोंग्री, ता. भूम, ८) विश्वनाथ रावण गरजे, धर्मवीर संभाजी विद्यालय, भोसगा, ता. लोहरा, ९) पांडुरंग सुखदेव कुमटकर, माणिकबाबा विद्यालय, शेळगाव, ता. परंडा (विज्ञान प्रसार व प्रचार), १०) श्रीमती मंजुषा कमलाकर स्वामी, (विज्ञान प्राथमिक पदवीधर) जि. प. प्राथमिक शाळा, वरुडा, ता. धाराशिव यांना जिल्हास्तरिय विज्ञान पुरस्कार वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र स्वामी यांनी केले तर बावची विद्यालयाच्या वतीने प्राचार्य नारायण खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन संतोष माळी यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांनी विज्ञान व शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आणि शिक्षकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, धाराशिव, बावची विद्यालय, परंडा व परंडा तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या वेळी परंडा तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुका अध्यक्ष बालासाहेब काळे व सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक विज्ञान शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!