परंडा येथील संत बाळूमामा मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
रंगोली न्युज - परंडा दि. ३)
An 'Akhand Harinam Saptah' (Continuous Chanting Week) has been organized at the Sant Balumama Temple in Paranda.
An 'Akhand Harinam Saptah' (Continuous Chanting Week) has been organized at the Sant Balumama Temple in Paranda. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील ब्रह्मांडनायक संत बाळूमामा मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे दि. ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीमध्ये अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ६ एप्रिल रोजी सकाळी कलश पूजन पीर महंत शामनाथजी महाराज गुरु गादी सोनारी यांच्या हस्ते होणार आहे. टाळ पूजन शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंखे तर विना पूजन शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हरिनाम सप्ताहामध्ये रोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ९ संत बाळूमामा "Saint Balumama" विजय ग्रंथ पारायण व आरती, सकाळी १० ते ११ गाथा भजन, ११ ते दुपारी १ महिला भजन, दुपारी २ ते ४ संत बाळूमामा चरित्र कथा, सायंकाळी ५ ते ७
हरिपाठ व आरती, ७ ते ९ किर्तन, व सायंकाळी ९ वाजता महाप्रसाद, नंतर १० ते पहाटे ३ वाजता हरिजागर असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ६ रोजी एप्रिल रोजी ह.भ.प. मारुती महाराज बारस्कर, दि. ७ रोजी एप्रिल रोजी ह.भ.प. सतीश महाराज सुर्यवंशी, दि. ८ रोजी एप्रिल रोजी ह.भ.प. भाग्यंवत महाराज रोडगे, दि. ९ एप्रिल रोजी ह.भ.प. दत्तात्रय महाराज हुके यांची कीर्तन सेवा होईल. दि. १० एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९ या वेळात दिंडी प्रदक्षिणा, ९ ते १० वाजता संतोष शामराव राऊत यांची प्रवचन सेवा होईल, सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे यांची काल्याचे कीर्तन सेवा संपन्न व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला मार्गदर्शक ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे तर व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. मारुती महाराज बारस्कर, संत बाळूमामा चरित्र कथा ह.भ.प. सुभाष महाराज म्हेत्रे, ह.भ.प. मारुती तात्या जाधव हे पाहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समितीच्या केशर ताई वैरागे (मदने) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!