ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

डी.बी.ए. समूहच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार साजरी. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti will be celebrated by the D.B.A. Group with various cultural programs.

डी.बी.ए. समूहच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार साजरी. 

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti will be celebrated by the D.B.A. Group with various cultural programs.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti will be celebrated by the D.B.A. Group with various cultural programs.

रंगोली न्युज - परंडा दि. ६) 

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti will be celebrated by the D.B.A. Group with various cultural programs. धाराशिव जिह्यातील परंडा येथे डी.बी.ए. समूहच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ व्या जयंतीनिमित्त डी.बी.ए. समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली डी.बी.ए. समूह  कार्यालय कुर्डूवाडी रोड येथे बैठक घेण्यत आली. १४ एप्रिल २०२६ रोजी आठवडा बाजार ठिकाणी परंडा येथे जयंती  साजरी करण्यात येणार असून या जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड. दयानंद धेंडे यांची तर उपाध्यक्षपदी महावीर बनसोडे यांची एक मतांनी निवड करण्यात आली. 

    यावेळी बैठकीमध्ये ठराव घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर डी.बी.ए. बचत गट नवीन काढण्याचे ठरले, व विविध सांस्कृतिक कार्यक्रम, निराधार महिलांसाठी साडी वाटप, गुणवत्ताधारक, विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, वही पेन, शालेय साहित्य वाटप, रुग्णालयामध्ये फळ वाटप व इमारत बांधकाम कामगार महामंडळची मोफत माहिती व कामगारांची आरोग्य तपासणी, आरोग्य सेवा कार्ड वाटप करण्याचे ठरले. 

       यावेळी हरिभाऊ गोडगे, पिंटू कोळी, कमलाकर खैरे, आनंद बनसोडे, संस्कृत्य बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, धर्मराज नरोटे, कालिदास काशीद, नागेश थोरात, सूर्योदय सरवदे, सम्यक धेंडे, माऊली पाटील, दत्तात्रय पाटील, दादा कोळी, इत्यादी  परंडा शहरातील भीमसैनिक व नागरिक बहुसंख्य उपस्थित होते. शेवटी दयानंद बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार माणले.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments