ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वंचित बहुजन आघाडी आयोजित जयंती महोत्सव अध्यक्षपदी विलास जाधव यांची निवड. Vilas Jadhav has been selected as the President of the Jayanti Mahotsav organized by the Vanchit Bahujan Aghadi.

वंचित बहुजन आघाडी आयोजित जयंती महोत्सव अध्यक्षपदी विलास जाधव यांची निवड.

Vilas Jadhav has been selected as the President of the Jayanti Mahotsav organized by the Vanchit Bahujan Aghadi.
Vilas Jadhav has been selected as the President of the Jayanti Mahotsav organized by the Vanchit Bahujan Aghadi.
रंगोली न्युज दि. )

Vilas Jadhav has been selected as the President of the Jayanti Mahotsav organized by the Vanchit Bahujan Aghadi. परंडा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ "Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary Celebration 2026" निमित्त जयंती उत्सव समिती गठनासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास जाधव, उपाध्यक्षपदी नवनाथ गावडे व सचिवपदी किरण बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

     धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मोहनदादा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर समितीचा कार्यकाळ दि. ११ एप्रिल २०२६ ते दि. ०५ एप्रिल २०२७ असा राहणार असून, या कालावधीत महापुरुषांच्या विचारांचा प्रसार, विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन करण्यासाठी समिती कार्यरत राहणार आहे. महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

        यावेळी फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष मोहनदादा बनसोडे, फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा समन्वयक डॉ.अनंत देडगे, तालुका अध्यक्ष संतोष हिवरे, तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, तालुका महासचिव राहुल पवार, उपाध्यक्ष शहाजी सोलनकर, शहराध्यक्ष किरण बनसोडे, तसेच इरशाद बागवान व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments