ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा शहरातील पाणी पुरवठ्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप. Ruling and opposition parties trade allegations over water supply in Paranda city. विरोधक महिला मुख्याधिकारी यांना त्रास देण्याचे काम करत आहेत! – नगराध्यक्ष जाकीर सौदागर

परंडा शहरातील पाणी पुरवठ्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप.

विरोधक महिला मुख्याधिकारी यांना त्रास देण्याचे काम करत आहेत! – नगराध्यक्ष जाकीर सौदागर

Ruling and opposition parties trade allegations over water supply in Paranda city.
Ruling and opposition parties trade allegations over water supply in Paranda city.

Ruling and opposition parties trade allegations over water supply in Paranda city. रंगोली न्युज - परंडा दि. ६) नागध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दि. ५ रोजी प्राकार परिषद घेऊन विरोधकांवर कडाडून टिका केली. यावेळी महिला मुख्याधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी केला. 

      परंडा शहरामध्ये मागील काही दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा खंडीत झाला होता. त्याअनुषंघाने विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. त्या अनुशंगाने रविवारी दि. ५ रोजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार टीका केली. याप्रसंगी जाकीर सौदागर म्हणाले की, मुख्याधिकारी यांनी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना स्वतंत्र कॅबिन दिलेली नाही. त्याच्या रागातुन परंडा न.प. च्या महिला मुख्याधिकाऱ्यांना विरोधी नगरसेवक त्रास देत असल्याचा आरोप नगराध्यक्ष सौदागर यांनी केला.

    पुढे सौदागर म्हणाले की, परंडा नगर परिषद मध्ये बहुमतात असलेल्या विरोधकांकडे पाणी पुरवठा सभापतीपद आहे. त्यामुळे शहरातील विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याला विरोधक हेच जबाबदार आहेत. विरोधक हे मुख्याधिकारी फोन उचलत नाहीत, दोन महिने पालिकेत आल्या नसल्याचा आरोप करत आहेत. हा आरोप चुकीचा असल्याचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले. ऐनवेळी विद्युत पंप नादुरुस्त झाला, रस्त्याची कामे चालु असल्याने काही ठिकाणी पाईपलाईन, इतर वायरिंग ची तुटफुट झाली असल्याने ते दुरूस्त करणे गरजेचे असते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही भागात निर्माण झाला होता. मात्र सध्या शहरात कुठेही पाणीटंचाई नसल्याचे नगराध्यक्ष सौदागर यांनी स्पष्ट केले.

      यावेळी दिलीप रणभोर, नगरसेवक वाजीद दखनी, बच्चन गायकवाड, माजी नगरसेवक संजय घाडगे, शरीफ तांबोळी, तन्नु मुजावर, रत्नकांत शिंदे, वैभव पवार, जावेद पठाण, मदन दीक्षित, इरफान शेख, सनी राशनकर, जयंत शिंदे, रवि भिस्ते, सुनील जगताप, दिपक कडबने, समीर पठाण, राहुल बनसोडे, बालाजी खताळ, अफताब शहाबर्फीलीवाले, खयुम तुटके, स्वप्निल तळकेर आदी उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments