"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीन" योजनेअंतर्गत e-KYC करण्यास मुदतवाढ.
३० एप्रिल २०२६ पर्यंत e-KYC करण्याची संधी.
![]() |
| Extension of the deadline for completing e-KYC under the "Chief Minister – My Beloved Sister" scheme. |
रंगोली न्यूज - परंड दि. ४) "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीन" योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभाथी महीलांनी दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतू यामध्ये e-KYC करताना झालेल्या चुकांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाकडून दि. ३१ मार्च २०२६ ची मुदत दिली होती. ती वाढवून आता e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यास दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
👉मुख्यमंत्री-माझी लाडक्या बहीणीला दिलासा : -
"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीन" योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी महिलांनी दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असलेल्या मुदतीमध्ये e-KYC पूर्ण केली. परंतू केलेल्या e-KYC मध्ये "लाभार्थ्यांच्या कुटूंबामध्ये सदस्य नियमित/कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे" याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचे पर्याय निवडण्यात आले. अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन e-KYC करण्यासाठी पुर्वी ३१ मार्च २०२६ रोजी ची मुदत देण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा दि. २ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणीला दिलासा म्हणुन आता दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
👉महत्वाचे :-
"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीन" योजनेअंतर्गत पात्र महिलांना e-KYC पूर्ण करण्यासाठी शासनाच्या संबंधीत पोर्टलवर सुधारण्या करण्यात आली आहे. ज्या लाभार्थी महीलांची e-KYC अपूर्ण असेल अशा महिलांनी दि. ३० एप्रिल २०२६ पुर्वी पूर्ण करून द्यावी. “अधिक माहितीसाठी संबधीत अधिकृत सरकारी वेबसाइटला भेट द्या”.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!