जागेच्या वादातून डॉक्टरकडून मारहाण; परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
![]() |
| Doctor assaults individual over land dispute; case registered at Paranda Police Station. |
परंडा दि. २७ (रंगोली न्यूज) –
Doctor attacks with stone and blade over land dispute; case registered at Paranda Police Station. परंडा शहरातील समतानगर झोपडपट्टी परिसरात जागेच्या वादातून शिवीगाळ, मारहाण व ब्लेडने हल्ला केल्याप्रकरणी डॉ. आनंद मोरे यांच्याविरोधात परंडा पोलीस ठाण्यात दि. २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
परंडा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आनंद मोरे यांच्या हॉस्पिटलजवळ वाहेद सौदागर यांची जागा असून त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. दि. २१ मे रोजी सौदागर हे जागेवर गेले असता शेजारील जागेत डॉ. मोरे यांनी भिंतीचे बांधकाम केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी फोनवरून विचारणा केली असता डॉ. मोरे यांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
त्यानंतर दि. २२ मे रोजी सकाळी फिर्यादी यांनी डॉ. मोरे यांचे वडील गोरख मोरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी मुन्ना उर्फ अजयसिंह ठाकूर यांच्याशी मध्यस्थीसाठी संपर्क साधला. त्यानंतर संध्याकाळी फिर्यादीचा भाऊ जाकीर सौदागर व अजयसिंह ठाकूर हे डॉ. आनंद मोरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले.
फिर्यादीनुसार, चर्चेदरम्यान डॉ. आनंद मोरे यांनी हातातील दगडाने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तो चुकविताना दगड उजव्या हाताच्या अंगठ्याला व छातीला लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सौदागर यांचा मुलगा उवेस सौदागर याच्या पाठीवर ब्लेडने वार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, उपस्थित नागरिकांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी एका महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप डॉ. आनंद मोरे यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!