परंडा येथे डॉक्टरवर हल्ला; दोघांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
![]() |
| Doctor Attacked in Paranda; Case Registered Against Three Individuals, Including Two |
परंडा दि. २५ (रंगोली न्यूज) –
धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील मोरे हॉस्पिटलच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या कारणावरून डॉ. आनंद मोरे यांना मारहाण झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी वाहेद सौदागर, नगराध्यक्ष जाकीर सौदागर व अन्य तिघांविरोधात परंडा पोलीस ठाण्यात दि. २५ मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परंडा शहरातील कुर्डूवाडी रोड, समता नगर येथे डॉ. आनंद मोरे यांचे हॉस्पिटल आहे. डॉ. मोरे यांनी हॉस्पिटलच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम केले होते. त्या कारणावरून वाहेद सौदागर यांनी डॉ. मोरे यांना फोनवरून विचारणा करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जाकीर सौदागर यांनी डॉ. मोरे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
त्यानंतर इतर तीन अनोळखी व्यक्तींनी डॉ. मोरे यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. यावेळी डॉ. आनंद मोरे यांच्या पत्नी डॉ. रमा मोरे यांनी “तुम्ही माझ्या पतीला का मारता?” अशी विचारणा केली असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी डॉ. मोरे यांच्या फिर्यादीवरून वाहेद सौदागर, नगराध्यक्ष जाकीर सौदागर व अन्य तीन अनोळखी व्यक्ती अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट हे करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!