परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे मार्गदर्शन व चर्चासत्र संपन्न
![]() |
| A guidance and discussion session was successfully conducted by the Paranda Taluka Chemists and Druggists Association. |
परंडा दि. २७ (रंगोली न्यूज) –
A guidance and discussion session was successfully conducted by the Paranda Taluka Chemists and Druggists Association. परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तालुकास्तरीय केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांसाठी आयोजित मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रम दि. २६ रोजी परंडा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे उपस्थित होते. यावेळी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त केमिस्ट बांधवांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
यामध्ये भगवंत मेडिकल, सिरसाव यांना २ लाख रुपये, शिवराज मेडिकल, चिंचपूर (खु.) यांना ८५ हजार रुपये तर एम. एस. मेडिकल, ढगपिंपरी यांना १ लाख १३ हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या व्यावसायिकांना ही आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे म्हणाले की, केमिस्ट बांधवांनी व्यवसायात पारदर्शकता राखून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. औषध व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. संघटनात्मक एकजूट कायम ठेवत सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास मन्नान बासले, फैझल दहलूज, तालुका प्रतिनिधी असिफ सय्यद, तालुकाध्यक्ष विकास जगदाळे, लक्ष्मण मुंढे, गजानन साळुंके, गणेश टकले, अन्वर शेख, दिपक ठाकूर, सादिक गणेचारी, राजेश ठक्कर, आनंद केसकर, इलियास बागवान, अवेज शेख, विष्णू भिसे, तेजराज गर्दळे, महेश ननवरे, जयराम डाकवले, महेश घाडगे, रियाज हन्नुरे, आरिफ सय्यद, अमित शेरखाने, रवि राष्ट्रपाल, अभय मस्के, पिंटू काकळे, यशवंत शिंदे, पाशा शहाबर्फीवाले, दिपक मोरे, रामदास सांगळे, नागेश सांगळे, केदार चोबे, शाम सांगळे, दिपक वाघ, अभिजित शेरखाने, सहदेव हिवरे, तुषार बागल, ज्ञानेश्वर भानवसे, अमोल कारले, आकाश पराडे, दत्तात्रय कदम, जोतिराम चोबे व जाफर शेख उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!