ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

हंसराज गणेश मंडळाच्या महाआरोग्य शिबिरात २५१ जणांची तपासणी. मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्याकडून कौतुक; ६० वर्षांच्या वाटचालीनिमित्त आरोग्य उपक्रम. 251 people examined at the Hansraj Ganesh Mandal's mega health camp.

हंसराज गणेश मंडळाच्या महाआरोग्य शिबिरात २५१ जणांची तपासणी.

मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्याकडून कौतुक; ६० वर्षांच्या वाटचालीनिमित्त आरोग्य उपक्रम.

251 people examined at the Hansraj Ganesh Mandal's mega health camp.
251 people examined at the Hansraj Ganesh Mandal's mega health camp.

परंडा, दि. २० (रंगोली न्यूज) – 251 people examined at the Hansraj Ganesh Mandal's mega health camp. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या हंसराज गणेश मंडळाच्या वतीने मंडळाच्या ६० वर्षांच्या वाटचालीनिमित्त रविवार (दि. २०) मोफत महाआरोग्य, सर्वरोग निदान व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन "Organization of a Mega Health, General Diagnosis, and Eye Examination Camp" करण्यात आले. या शिबिरात एकूण २५१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर श्री गणेशाची आरती करून त्यांनी शिबिराला भेट दिली व नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवेची पाहणी केली.

यावेळी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, “हंसराज गणेश मंडळ विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मंडळाला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण सदैव तयार आहोत.” मंडळाला ६० वर्षांचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा असून नवीन युवा कार्यकर्ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही परंपरा पुढे नेत आहेत. सामाजिक कार्यासाठी जिल्हा परिषद तसेच वैयक्तिक पातळीवरही आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

सर्वरोग निदानासह नेत्र तपासणीची सुविधा

हंसराज गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सर्वरोग निदान आणि नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वरोग निदान शिबिरासाठी बार्शी येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. धीरज जाधव, डॉ. प्रशांत पाटील तसेच शहाजी नलवडे (श्रद्धा लॅब) यांचे सहकार्य लाभले. श्रद्धा लॅबच्या माध्यमातून रक्त, लघवी व मधुमेह तपासणी करण्यात आली.

सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन डॉ. प्रशांत गोफणे यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली.

दरम्यान, नेत्ररोग तपासणीसाठी एच. व्ही. नेत्ररुग्णालय, हडपसर, पुणे संचलित शंकरशेठ साबळे नेत्ररुग्णालय, सोलापूर यांच्या सहकार्याने गरजू रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. रेवडकर हॉस्पिटल येथे करण्यात आले.

६० वर्षांच्या सामाजिक वाटचालीला आरोग्यसेवेची जोड

हंसराज गणेश मंडळाला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या दीर्घ सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीचा गौरव करत मंडळाच्या वतीने यंदा विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक कार्यक्रम न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना समर्थ कुळधर्मे यांनी केली, तर सूत्रसंचालन राहुल बनसोडे यांनी केले.

यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, युवा नेते सोहम सावंत, नगरसेविका रत्नमाला बनसोडे, डॉ. आब्बास मुजावर, अनिल शिंदे, राहुल बनसोडे, राखी देशमुख, माजी नगरसेवक मकरंद जोशी, रत्नकांत शिंदे, नितीन भोत्रेकर, राहुल देवळे, प्रमोद वेदपाठक, चकोर महामुनी, गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित जोशी, राहुल मुगळीकर, भगवान शहाणे, अमोल जोशी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

६० वर्षांच्या परंपरेला सामाजिक सेवेची जोड देत हंसराज गणेश मंडळाने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरामुळे नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments