ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वडणेरमधील जीर्ण पाण्याची टाकी पाडून जलजीवन योजनेतील नवीन टाकी सुरू करा. अपघाताचा धोका लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी. Demolish the dilapidated water tank in Vadner and commission a new tank under the Jal Jeevan Mission.

वडणेरमधील जीर्ण पाण्याची टाकी पाडून जलजीवन योजनेतील नवीन टाकी सुरू करा.

अपघाताचा धोका लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी.

Demolish the dilapidated water tank in Vadner and commission a new tank under the Jal Jeevan Mission.
Demolish the dilapidated water tank in Vadner and commission a new tank under the Jal Jeevan Mission.

परंडा, दि. २२ (रंगोली न्यूज) : Demolish the dilapidated water tank in Vadner and commission a new tank under the Jal Jeevan Mission. परंडा तालुक्यातील वडणेर येथील जीर्ण झालेली पिण्याच्या पाण्याची टाकी तातडीने पाडण्यात यावी आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली नवीन पाण्याची टाकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत शहाजी ज्ञानदेव चौधरी, बालाजी भारत चौधरी आणि संतोष मोहन शेलार यांनी पंचायत समिती, परंडा येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी अर्ज दिला आहे.

वडणेर येथे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी असलेली जुनी पाण्याची टाकी सध्या जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे अर्जदारांनी निवेदनात नमूद केले आहे. सदर टाकीची अवस्था पाहता ती कधीही कोसळण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ग्रामपंचायतीने तीन-चार वर्षांपूर्वी केला ठराव

अर्जदारांच्या म्हणण्यानुसार, जीर्ण झालेली ही पाण्याची टाकी पाडण्याबाबत ग्रामपंचायतीने सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी बहुमताने ठराव मंजूर केला आहे. मात्र, अद्याप या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

जुनी टाकी पाडण्याची मागणी करताना परिसरातील परिस्थितीकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. टाकीजवळच अंगणवाडी असून, लगत रहदारीचा रस्ता आहे. तसेच परिसरात देवीचे मंदिरही आहे. त्यामुळे टाकी कोसळल्यास नागरिक, लहान मुले तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

जलजीवन योजनेतील टाकी सुरू करण्याची मागणी

वडणेर गावासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली पाण्याची टाकी सुरू करून गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करावी, अशीही मागणी अर्जदारांनी केली आहे. नवीन टाकी उपलब्ध असताना जीर्ण झालेल्या जुन्या टाकीमुळे निर्माण होणारा धोका कायम ठेवणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दुर्घटना झाल्यास प्रशासन जबाबदार?

जीर्ण टाकीच्या परिसरात अंगणवाडी, रहदारीचा मार्ग आणि मंदिर असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात टाकी कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही अर्जदारांनी निवेदनातून दिला आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने जीर्ण पाण्याच्या टाकीची तातडीने पाहणी करून ती पाडण्याची कार्यवाही करावी, ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या ठरावाची अंमलबजावणी करावी आणि जलजीवन योजनेअंतर्गत झालेली नवीन पाण्याची टाकी तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी शहाजी चौधरी, बालाजी चौधरी व संतोष शेलार यांनी केली आहे.

या मागणीवर पंचायत समिती प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे वडणेर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments