ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रा. गे. शिंदे महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न. १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन; फॉर्म क्रमांक ६ चे वितरण. New Voter Registration Camp Held at R. G. Shinde College.

रा. गे. शिंदे महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन; फॉर्म क्रमांक ६ चे वितरण.

New Voter Registration Camp Held at R. G. Shinde College.
New Voter Registration Camp Held at R. G. Shinde College.

परंडा, दि. २२ (रंगोली न्यूज) : New Voter Registration Camp Held at R. G. Shinde College. महाराष्ट्र शासनाच्या तहसील कार्यालय, निवडणूक विभाग, परंडा आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिराचे आयोजन "https://www.rangolinews1.com/" करण्यात आले. या शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परंडा तहसीलदार निलेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नायब तहसीलदार प्रसाद टिळे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी प्रक्रिया आणि मतदानाच्या महत्त्वाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार प्रसाद टिळे यांनी सांगितले की, १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नोंदणी करणे हे महत्त्वाचे नागरी कर्तव्य आहे. लोकशाही व्यवस्थेत मतदानाला विशेष महत्त्व असून, नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मतदार नोंदणी कशी करावी, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, अर्जाची प्रक्रिया कशी पूर्ण करावी तसेच मतदानाचा अधिकार आणि त्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार प्रसाद टिळे यांच्या हस्ते १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६ वितरित करण्यात आला.

या शिबिरास मंडळ अधिकारी एम. एन. सातपुते, ग्राम महसूल अधिकारी बी. आर. डावखरे, तहसील कार्यालयातील कर्मचारी अमोल हंकारे, रोहित जाधव तसेच डॉ. शहाजी चंदनशिवे उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी झाले. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अरुण खर्डे, डॉ. बी. बी. राऊत, डॉ. विद्याधर नलवडे, डॉ. विशाल जाधव, डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डी. जी. पवार, प्रा. रणजीत वरपे आदी उपस्थित होते.

या शिबिराच्या माध्यमातून नवमतदार विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि मतदानाचे महत्त्व याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये व मतदानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments