ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा तालुक्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरांचे आयोजन. ११ आणि १६ सप्टेंबर रोजी मंडळ स्तरावर विशेष शिबिरे Special camps organized in Paranda Taluka for Kunbi, Maratha-Kunbi, and Kunbi-Maratha caste certificates.

परंडा तालुक्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरांचे आयोजन.

११ आणि १६ सप्टेंबर रोजी मंडळ स्तरावर विशेष शिबिरे

Special camps organized in Paranda Taluka for Kunbi, Maratha-Kunbi, and Kunbi-Maratha caste certificates.
Special camps organized in Paranda Taluka for Kunbi, Maratha-Kunbi, and Kunbi-Maratha caste certificates.

परंडा, दि. १० (रंगोली न्यूज) — Special camps organized in Paranda Taluka for Kunbi, Maratha-Kunbi, and Kunbi-Maratha caste certificates. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार परंडा तालुक्यातील सात महसूल मंडळांच्या स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

Special camps organized in Paranda Taluka for Kunbi, Maratha-Kunbi, and Kunbi-Maratha caste certificates.
Special camps organized in Paranda Taluka for Kunbi,
Maratha-Kunbi, and Kunbi-Maratha caste certificates.

निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्यात झालेल्या तपासणीअंती परंडा तालुक्यात कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या नोंदींची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालये आणि ग्राम महसूल अधिकारी कार्यालयांमध्ये नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

११ आणि १६ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरे

परंडा तालुक्यातील सात महसूल मंडळांमध्ये दि. ११ सप्टेंबर २०२६ आणि दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जुन्या अभिलेखांमध्ये कुणबी नोंद आढळलेल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महसूल मंडळात उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या शिबिरांमुळे पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध असलेल्या जुन्या अभिलेखांमधील कुणबी नोंदी तपासून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जात प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही अडचण अथवा शंका असल्यास नागरिकांनी तहसील कार्यालय, परंडा येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार निलेश काकडे यांनी केले आहे.

कुणबी नोंदींची यादी पाहण्यासाठी: जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Kunbi-Maratha Documents विभागाचा नागरिकांनी उपयोग करावा.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!





Post a Comment

0 Comments