एमपीएससीची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या.
आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल; खसापुरी येथील शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर.
“प्रथमेशचा मृत्यू म्हणजे सरकारच्या व्यवस्थेचा बळी” — अभिजित दिपके यांचा घणाघाती आरोप.
![]() |
| 25-year-old Prathamesh Deshmukh, an MPSC aspirant, commits suicide in Pune. |
परंडा, दि. १० (रंगोली न्यूज) — 25-year-old Prathamesh Deshmukh, an MPSC aspirant, commits suicide in Pune. एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास असलेल्या परंडा तालुक्यातील खसापुरी येथील २५ वर्षीय प्रथमेश देशमुख या तरुणाचा पुण्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. ९ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील नारायण पेठ परिसरात उघडकीस आली. प्रथमेशच्या मृत्यूने खसापुरीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रथमेश देशमुख हा खसापुरी येथील शेतकरी कुटुंबातील असून एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो पुण्यात राहत होता. शिक्षण, राहण्याचा व दैनंदिन खर्चाचा वाढता आर्थिक भार तसेच त्याच्यावर अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. या आर्थिक विवंचनेतून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अधिकृत तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
वडिलांचे छत्र आधीच हरपलेले
प्रथमेशचे वडील मयत असून त्याची आई खसापुरी येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. प्रथमेशला चार विवाहित बहिणी आहेत. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रथमेशच्या अकाली निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
प्रथमेशच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर खसापुरी येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.
अभिजित दिपके यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
दरम्यान, प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी दि. १० सप्टेंबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके खसापुरी येथे आले. त्यांनी प्रथमेशच्या आई व बहिणींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांची व्यथा ऐकताना दिपके यांना अश्रू अनावर झाले. “आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा दिलासा त्यांनी देशमुख कुटुंबीयांना दिला.
यावेळी बोलताना अभिजित दिपके यांनी प्रथमेशच्या आत्महत्येवरून सरकारच्या व्यवस्थेवर घणाघाती टीका केली. “प्रथमेश देशमुखची आत्महत्या म्हणजे सरकारच्या व्यवस्थेचा बळी असून, या परिस्थितीसाठी सरकारची यंत्रणाच जबाबदार आहे,” असा आरोप त्यांनी केला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांना शिक्षण, निवास, आर्थिक मदत आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.
यावेळी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, युवक तसेच खसापुरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथमेशसारख्या ग्रामीण भागातील युवकांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!