ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून भेट आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने दोन लाखांची मदत; शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. Minister of State for Home Yogesh Kadam meets the family of Prathamesh Deshmukh, who committed suicide due to financial hardship.

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून भेट

आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने दोन लाखांची मदत; शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Minister of State for Home Yogesh Kadam meets the family of Prathamesh Deshmukh, who committed suicide due to financial hardship.
Minister of State for Home Yogesh Kadam meets the family of Prathamesh Deshmukh, who committed suicide due to financial hardship.

परंडा, दि. १२ (रंगोली न्यूज) — Minister of State for Home Yogesh Kadam meets the family of Prathamesh Deshmukh, who committed suicide due to financial hardship. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खसापुरी येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याचा पुणे येथे आर्थिक विवंचनेतून मृत्यू झाल्याची घटना दि. ९ सप्टेंबर रोजी घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी खसापुरी येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी प्रथमेशच्या कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या. गृहराज्यमंत्री कदम यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वतीने देशमुख कुटुंबीयांना दोन लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश यावेळी देण्यात आला.

देशमुख कुटुंबाला घरकुल, संजय गांधी निराधार योजना तसेच इतर पात्र शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी एमपीएससीसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणींचाही मुद्दा उपस्थित झाला. सारथी योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी लाभार्थी संख्या वाढविण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री कदम यांनी दिले.

या भेटीप्रसंगी जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, जयप्रकाश राजेनिंबाळकर, सुधीर पाटील, नगराध्यक्ष जाकिर सौदागर, अण्णासाहेब जाधव, नवनाथ जगताप, राहुल डोके, मेघराज पाटील, तहसीलदार निलेश काकडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments