गणेशोत्सवात गुलालाऐवजी गुलाब फुलांची उधळण करा.
परंडा येथे शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचे आवाहन.
![]() |
| During Ganeshotsav, shower rose petals instead of *gulal*. |
परंडा, दि. ११ (रंगोली न्यूज) — During Ganeshotsav, shower rose petals instead of *gulal*. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यासह शहरात आगामी गणेशोत्सव साध्या, शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. मिरवणुकीदरम्यान गुलालाऐवजी गुलाबाच्या फुलांची उधळण करावी, तसेच दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार विजय बाडकर, महावितरणचे संकेत मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसट, ॲड. संदीप पाटील, ॲड. श्रीकांत भालेराव, नगरसेवक वाजीद दखनी, राहुल बनसोडे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्या मांडल्या तसेच प्रशासनाकडे काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक चोरमले यांनी गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्रत्येक गणेश मंडळाने ऑनलाइन नोंदणी करावी, असे सांगून चोरमले म्हणाले की, डीजेवर बंदी असल्याने मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा. महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घ्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक गणेश मंडळाने मंडप व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. उत्सव काळात कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा.
इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे आवाहन
सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात अनावश्यक खर्च व पाण्याचा वापर टाळावा. इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करून पर्यावरणाची हानी टाळावी, तसेच उत्सव साधेपणाने आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहनही पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी केले.
गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, शांतता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरावा. सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!