ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

‘घर घर संविधान’ रथ यात्रेचे बावची विद्यालय, परंडा येथे उत्साहात स्वागत. House House Constitution

House House Constitution
House House Constitution

‘घर घर संविधान’ रथ यात्रेचे बावची विद्यालय, परंडा येथे उत्साहात स्वागतThe 'Ghar Ghar Samvidhan' Rath Yatra was welcomed with enthusiasm at Bavchi Vidyalaya, Paranda.

परंडा - दि. २३) महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित 'घर घर संविधान’ रथ यात्रेचे बावची विद्यालय, परंडा येथे दि. २३ रोजी आगमन झालेल्या रथ यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

  House House Constitution यावेळी रथासोबत आलेल्या कलाकारांनी प्रभावी व संदेशपूर्ण पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

         कार्यक्रमादरम्यान विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची व संविधानाचे पालन करण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे विद्यालय परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 hwww.rangolinews1.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments