
"My village, a healthy village"
१ एप्रिल पासून "माझ गाव, आरोग्य संपन्न गाव" अभियानाची होणार सूरवात!

उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा "आरोग्य संपन्न ग्राम" म्हणून होणार गौरव!
"My village, a healthy village" परंडा - दि. २३) ग्रामीण खेड्यांना स्वच्छ, स्वावलंबी व निरोगी बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतुन "माझ गाव, आरोग्य संपन्न गाव" "My village, a healthy village"अभियानाची दि. १ एप्रील २०२६ पासून अंमलबजावनीचा शासनाने निर्णय घेतला असून यामुळे यामुळे आपल्या खेड्यापाड्यातील ग्रामीन नागरीकांसाठी सुलभ, प्रतिबंधात्मक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊन त्यांना निरोगी सक्षम सशक्त व जागरूक ग्रामीण समुदाय घडविण्यासाठी हा या अभियानाचा उद्देश आहे.
"My village, a healthy village"
राज्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये राबविण्यात होणाऱ्या या अभियान हे ग्रम पंचायात च्या केंद्रस्थानी असून यामध्ये ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यामध्ये उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हे प्रमुख घटक असणार आहेत.
आरोग्याच्या दृष्टीकोणातून ग्रामीण गावांचा सर्वांगीन विकास सुधारणेसाठी मूलभूत आरोग्य सेवा, पोषण, स्वच्छता, शुध्द पाणी, जनजागृती, संगणकीकृत आरोग्य माहीती संकलन, प्रशिक्षण व प्रशासन समन्वयाचा समावेश करून "माझ गाव, आरोग्य संपन्न गाव" अभियान अंतर्गत आरोग्य हे ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी असणार आहे. 'My village, a healthy village'
या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थ, जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कार्यरत समुदाय अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, आशा व ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. या अभियानातून गुणवत्तात्मक कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीची healthy village "आरोग्य संपन्न ग्राम" असे मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. त्यासाठी प्रत्तेक वर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीमधील प्रशिक्षण, सेवा व अंमलबजावणी या घटकांचा मुल्यमापन व पुरस्कार वितरण साठी विचार केला जाणार आहे. या राज्यस्तरीय अभियानाची सुरवात सार्वजनीक आरोग्य विभागाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी दरवर्षी १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये सर्व ग्रामपंचायत व आरोग्य संस्थांना नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. या आरोग्य अभियान अंमलबजावणी व राज्यस्तरा ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. जे गाव निर्देशांका प्रमाणे एकूण गुणांच्या ७० टक्के गुण प्राप्त करीतल अशा सर्व ग्रामपंचायतींना "My village, a healthy village" जिल्हा समितीमार्फत "आरोग्य संपन्न ग्राम" म्हणून घोषीत करून त्यांना मृती चिंन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!