
Research is important for the development of the country
रा.गे. शिंदे महाविद्यालयात सी. व्ही. रमन व्याख्यानमाला संपन्न. .....

देशाच्या विकासासाठी संशोधन महत्वाचे. ..... प्राचार्य डॉ. संतोष उंदरे. Research is important for the development of the country
परांडा - दि. २१) देशाच्या विकासासाठी संशोधन महत्वाचे Research is important for the development of the country असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द आणी चिकाटीने प्रत्येक विषयामध्ये संशोधन करावे असे प्रतिपादन बलभीम महाविद्यालय बीड येथील प्राचार्य डॉ. संतोष उंदरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर सी. व्ही. रमण व्याख्यानमाला कार्यक्रमाप्रसंगी केले.
परंडा येथील रा.गे. शिंदे महाविद्यालय येथे डॉ. सी. व्ही. रमण व्याख्यानमाला कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आला होता त्या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ. संतोष उंदरे यांनी वरील उद्गार काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ माहेशकुमार माने उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. संतोष उंदरे दयानंद महाविद्यालय लातूर येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. महादेव पांडगे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय लातूर येथील डॉ. रविकिरण बिराजदार उप प्राचार्य डॉ. महेशकुमार माने मराठी विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र रंदील डॉ. अक्षय घुमरे डॉ. विद्याधर नलवडे सायन्स फोरमचे चेअरमन डॉ. अमर गोरे पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. शहाजी चंदनशिवे व डॉ. अक्षय घुमरे यांनी करून दिला. यावेळी डॉ. महादेव पांडगे यांनी रमन इफेक्ट इन स्पेस ॲण्ड ऍस्ट्रोफिजिक्स या विषयावर पीपीटी द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानाचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. विद्याधर नलावडे यांनी केले. कार्यक्रमासाठी पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी संशोधक विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांचे डॉ. सचिन चव्हाण यांनी आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396
.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!