जिजामाता शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी. .....
![]() |
| Shiv Jayanti celebrated with enthusiasm at Jijamata School |
परंडा - दि. २१) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिजामाता शाळेत मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी करण्यात आली.
शिवजयंतीच्या निमित्ताने निलेश काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव, अमोल कातंगळे समाज कल्याण निरीक्षक यांची सदिच्छा भेट देऊन बाल शाळेतील शिवाजींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेतील मुलांनी शिवाजी महाराज व जिजाऊ, मावळे यांची वेशभूषा धारण केली होती. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. शिवगर्जना, पोवाडे, लाठी - काठी मर्दानी खेळ दाखवले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजीत घाडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाणे, शिला कांबळे, मंगल हिंगनकर,अश्विनी गवारे, सोनाली विभुते, देशमुख सुजाता, धनश्री काळे, दिपाली सुतार आदी शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाबळे तर आभार प्रदर्शन संतोष गवळी यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!