
Parandya's Paithani went to Amravati
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमातुन परंड्याची पैठणी शिवविचारसह गेली अमरावतीला. .... Parandya's Paithani went to Amravati

परंडा - दि. २०) छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव २०२६ निमीत्त गतवर्षी प्रमाणे याही वर्षी मराठा सेवा संघ, सभांजी ब्रिगेड तसेच जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने वैचारीक मनोरंजनातून जिंका पैठणी हा आगळा वेगळा कार्यक्रम जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या प्रदेश सहसचिव शिवमती आशाताई मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दि. १८ रोजी सायंकाळी दीपोत्सव दरम्यान वैचारिक मनोरंजनातून जिंका पैठणी अंतर्गत पाच विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. पहिले बक्षीस मिक्सर, द्वितीय बक्षीस कुकर तर तृतीय बक्षीस स्टीलचा टब अशा एकुण पंधरा बक्षीसांसह सन्मान चिन्ह व एक पैठणी ठेवण्यात आली होती. त्यानुसार राजमाता जिजाऊ मासाहेब या विषयामध्ये पलक कोकाटे प्रथम, सुप्रिया गटकुळ द्वितीय तर प्रभा पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. छत्रपती शिवाजी महाराज या विषयामध्ये अर्चना भांडवलकर प्रथम, ऋतुजा वायसे द्वितीय, तर मीनाक्षी विटकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. छत्रपती संभाजी महाराज या विषयामध्ये राजनंदिनी शेलार प्रथम, माधुरी सुरवशे द्वितीय तर शितल गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महाराणी येसूबाई साहेब या विषयामध्ये मयुरी डाके प्रथम, आराध्या भांडवलकर द्वितीय तर ऋतुजा भगत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महाराणी ताराबाई साहेब या विषयामध्ये सेजल जाधव प्रथम, आकांक्षा देशमुख द्वितीय तर ईश्वरी पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक मिळविलेल्या पाच महिलांमधून संगित खुर्चीच्या साह्याने सेजल जाधव यांची पैठणीच्या खऱ्या मानकरी म्हणून निवड करण्यात आली. सेजल जाधव या अमरावतीच्या आहेत. त्या दोन दिवसासाठी परंडा येथे आपल्या नातेवाईकाकडे पाहुण्या म्हणून आल्या आणि या वैचारिक कार्यक्रमात सहभागी होऊन पैठणी जिंकून घेऊन गेल्या. त्यांनी कार्यक्रमातील शिवविचार ऐकले, आत्मसात केले आणि म्हणूनच परंड्याची पैठणी शिवविचारासह गेली अमरावतीला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!