
Paranda Deputy Tehsildar Puja Gore felicitated by the District Collector
परंडा नायब तहसीलदार पुजा गोरे यांचा जिल्हाधीकारी यांच्या हस्ते गौरव. .....

परंडा - दि. २०) सामान्य नागरीकांना महसुली कार्यालयाकडून शासकीय दाखले मिळऊन देणेसाठी परंडा तहसील कार्यालय यांनी गतिमान प्रशासन नियोजनाचा आदर्श अवलंबून आपल्या कृतीतुन दाखवुन दिले आहे. यामध्ये परंडा नायब तहसिलदार पुजा गोरे यांनी गतिमान प्रशासकीय नियोजनामध्ये आदर्शयुक्त कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधीकारी किर्ती किरण पुजार, यांच्यासह जिल्हा परिषर मुख्य कार्यकारी अधिकारी मैनिक घोष, भूम उपविभागीय अधिकारी रेवण्णा डोंगरे आदी उपस्थित होते.
प्रत्तेक शैक्षणीक वर्षाला महसुली दाखले, तसेच नागरीकांना आवश्यक प्रमाणपत्रे यासाठी सर्वसामान्य नागरीकांना आपली दैनंदीन कामे सोडून तहसिल कार्यालयाकडे विनाकारण च्या फेऱ्या होऊ न देणे, विद्यार्थी, पालक यांना शैक्षणीक सत्रासाठी लागणारी महसुली दाखले वेळेवर मिळावीत या उद्देशाने ना.त. पुजा गोरे यांनी सेतु सुविधा केंद्राच्या कामकाजामध्ये योग्य तो बदल, सुसूत्रता आणली. त्यांनी याचा पदभार घेतल्यानंतर आपले सरकार सेतु केंद्र पोर्टलवरील प्रलंबीत प्रकरणे तात्काळ निकाली काढणे, त्रुटीमधील प्रकरणाचा संबंधीत केंद्रचालकाकडून त्याची पुर्तता करूण घेणे, नागरीक, पालक, विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शत करणे या त्यांच्या कार्यपध्दतीमुळे परंडा तहसिल कार्यालयामध्ये सुसूत्रता वाढू लागली.
परंडा तहसिल कार्यालयामधील शासकिय योजना, शैक्षणीक दाखले आदी महसुली कामकाजासाठीची नागरीकांची होणारी हेळसांड संपवण्याचा ना.त. पुजा गोरे यांनी प्रामाणीक प्रयत्न केला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यातुन प्रशासकीय अधीकारी यांनी दक्षता बाळगली तर नागरीकांचे प्रश्न सुटण्यास वेळ लागत नाही हे उदाहरण परंडा तहसील ने दिले आहे.
[ ] हा विशेष गौरव कार्यालयातील सर्व सहकारी यांचा असुन यामध्ये महसुल कर्मचारी अमोल हंकारे, संगणक ऑपरेटर यशपाल बनसोडे यांच्या सहकार्याने सक्षम कार्यपध्दती अवलंबीता आली. त्यांनी संगणकावरील त्रुटीतील प्रकरणे तात्काळ निपटारा करणेसाठी नागरीकांना योग्य त्या कागदपत्राची पुर्तता करण्याचे सेतु केंद्रचालकामार्फत सुचीत करून वेळेत निकाली काढली. त्यामुळे हा जिल्हाधिकारी यांच्या कडून झालेला विशेष गौरव हा सर्व परंडा तहसिल टिम चा आहे. .... नायब तहसीलदार - पुजा गोरे
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com
-: शहाजी कोकाटे :-
मो.नं. 9890121396
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!