Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात. ..... Chatrapati Shivjayanti Utshav

Chatrapati Shivjayanti Utshav
Chatrapati Shivjayanti Utshav

Chatrapati Shivjayanti Utshav
परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात. .....

परंडा - दि. १९) मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड परंडा तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९४ वा जन्मोत्सव परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. 

       शिवजयंतीनिमित्त भव्य अशा उभारलेल्या शामीयाच्या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीपुजन, पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. जात, धर्म भेदभाव न करता शिवाजी महाराज यांच्या विचारांचे पालन करण्याची उपस्थितांना शपथ देण्यात आली. शिवजयंती निमीत्त शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरीत्रपर भाषण, विविध कला सादर केल्या. उपस्थितांना पप्पु पठाण यांच्या वतीने उपस्थितांना सरबत वाटप करण्यात आले. तसेच पेढे वाटप करून शिवजयंतीचा आनंद द्विगुणीत केला.

        या प्रसंगी माजी आ. सुजितसिंह ठाकूर, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, शिवसेना (ठाकरे) जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, उद्योजक तुकाराम (काका) साळुंके, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सहसचिव आशाताई मोरजकर, आर.पी.आय. सरचिटणीस रंजयकुमार बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहूल बनसोडे, माजी नगराध्यक्ष मुकूल देशमुख, तानाजी बनसोडे, रवी मोरे, मतीन जिनेरी, पै. अप्पा काशीद, रत्नकांत शिंदे, हणुमंत गायकवाड, श्रीहरी नाईकनवरे, अमोल चौतमहाल, अंगद धुमाळ, राजकुमार देशमुख, शशिकांत जाधव, मणोज कोळगे, देवानंद टकले, अमर साळुंके, श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर, विजयकुमार पाटील, बाशा शहाबर्फीवाले, ह.भप. नागेश मांजरे महाराज, आदी मान्यवरांसह परंडा तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते.

[ ] परंडा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. ...

       विविध  तसेच परंड तालुक्यातील कुंभेजा, भोंजा सह खेडोपाडी, शासकिय, निमशासकिय कार्यालय, शाळा, महाविद्यालय येथे स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, पुष्पहार अर्पन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. 

Chatrapati Shivjayanti Utshav
कुंभेजा येथे ग्रामस्थांच्या वतिने छत्रपती शिवरायांना अभिवादन. ...

 

Chatrapati Shivjayanti Utshav
भोंजा येथील शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात शिवभक्त ग्रामस्थ. ...



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 https://rangolinews1.blogspot.com

-: शहाजी कोकाटे :-

मो.नं. 9890121396

Post a Comment

0 Comments