संत मीरा पब्लिक स्कूल मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा. ... 'Marathi Language Pride Day' celebrated at Sant Mira Public School
ज्ञान, साहित्य, विचार, संस्काराची समृद्ध परंपरा लाभलेली मराठी भाषा. ... डॉ. प्रतापसिंह पाटील
यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे, कविता वाचन, नाटिका आणि गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. काही विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांच्या वेशभूषेतून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आपल्या मनोगतात मराठीबद्दल बोलताना "ज्ञान, साहित्य, विचार आणि संस्कार यांची समृद्ध परंपरा लाभलेली भाषा म्हणजे मराठी. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाचीआहे. जागतिकीकरणाच्या युगातही मातृभाषेचे महत्त्व अबाधित राहिले पाहिजे. मराठी भाषा ही संत, समाजसुधारक आणि महान साहित्यिकांच्या कार्यामुळे अधिक समृद्ध झाली आहे" असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून, महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे माजी शिक्षक भारत घोगरे, पवार, प्रताप रोडगे, मुख्याध्यापक संतोष भांडवलकर तसेच मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक सुनील चव्हाण, प्रीती देशपांडे, राणी भिलारे, पूनम शिंदे व ज्योती जगदाळे व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. संपूर्ण परिसर मराठी घोषवाक्ये व साहित्यिकांच्या विचारांनी सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘जय महाराष्ट्र’ च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. मराठी भाषेप्रती आदर आणि अभिमान व्यक्त करत हा दिवस संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी नांगरे तर सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!