देवगाव (खु.) येथील जि.प.शिक्षक किरण विभूते यांच्या ''मॉरल स्टोरीज'' पुस्तकाचे प्रकाशन. ...
मुळचे भूम तालुक्यातील देवळाली येथील व सध्या परंडा येथे वास्तव्यास असलेले किरण विभूते हे जि.प प्राथमिक शाळा देवगाव खु. येथे प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण बी.एस्सी. डी.एड. झाले असून किरण विभुते हे एक उपक्रमशील जिल्हा परिषद शिक्षक असून त्यांची यापूर्वी इंग्लिश ऍक्टिव्हिटी वर्कबुक आणि 'इंग्लिश एस्से बुक' ही दोन शैक्षणिक पुस्तके प्रकाशित आहेत, तसेच त्यांचा 'तो आपला नाही' हा कवितासंग्रह देखील प्रकाशित झालेला आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला. पूरग्रस्त शाळेला मदत करण्यासाठी आवर्जून मुंबईवरून उपस्थित राहिलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई चे सचिव विनोद पवार व सेवा सहयोग फाउंडेशन च्या प्रोग्राम मॅनेजर दिपाली देवळे या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदरील "मॉरल स्टोरीज" या पुस्तकांमध्ये एकूण २२ इंग्रजी मॉरल स्टोरीज चा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासात आणि वाचनात येणाऱ्या छान छान गोष्टी इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपयोगी ठरणार आहेत. तसेच कथेचे सादरीकरण करणे परिपाठामध्ये बोधकथा सांगणेसाठी या पुस्तकाचा प्राथमिक विद्यार्थ्यांना उपयोग होईल.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!