ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बावची विद्यालय, परांडा येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा. ..... Marathi Language Pride Day celebrated with enthusiasm at Bavchi Vidyalaya, Paranda

बावची विद्यालय, परांडा येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा. ..... Marathi Language Pride Day celebrated with enthusiasm at Bavchi Vidyalaya, Paranda

Marathi Language Pride Day celebrated with enthusiasm at Bavchi Vidyalaya, Paranda
परांडा दि. २७) महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा ‘मराठी भाषा गौरव दिन’ बावची विद्यालय, परांडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      या निमित्ताने विद्यालयात वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मराठी भाषेचे वैभव, तिची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यावर आपली मते प्रभावीपणे मांडली. स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना योग्य ती बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

        कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल आपली मनोगते व्यक्त करत, “माझी मायबोली मराठी” या विषयावर विचार मांडले. मराठी विभागाने मराठी भाषा संवर्धनाबाबत आकर्षक फलक, घोषवाक्ये, साहित्य प्रदर्शन आणि माहितीपर उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले.

      यावेळी विद्यालयाचे मु. अ. नारायण खैरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “मराठी ही आपली मायबोली असून तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दैनंदिन व्यवहारात, शिक्षणात आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. मराठी भाषा टिकण्यासाठी सर्व स्तरांवर सातत्यपूर्ण प्रयत्न होणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सोनकांबळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. एडके यांनी केले.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

Post a Comment

0 Comments