ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार नवी दिशा; कुरुक्षेत्र करिअर अकॅडमीचा दिमाखात शुभारंभ. New direction for the dreams of rural students; Kurukshetra Career Academy launched with great fanfare.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार नवी दिशा; कुरुक्षेत्र करिअर अकॅडमीचा दिमाखात शुभारंभ.

New direction for the dreams of rural students; Kurukshetra Career Academy launched with great fanfare.
New direction for the dreams of rural students; Kurukshetra Career Academy launched with great fanfare.

परंडा दि. १४ (रंगोली न्यूज) — New direction for the dreams of rural students; Kurukshetra Career Academy launched with great fanfare. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र परबत यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात, परंडा–बार्शी रोडवरील ढगपिंपरी येथे सुरू करण्यात आलेल्या कुरुक्षेत्र करिअर अकॅडमीचा शुभारंभ सोहळा सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दर्जेदार शिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.

या अकॅडमीचे उद्घाटन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा जि. प. सदस्य आणि युवकांचे प्रेरणास्थान धनंजय दादा सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, माजी पं.स. सभापती गौतम लटके आणि युवा नेते रेवण ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण विद्यार्थ्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, मेहनत आणि जिद्द असूनही स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांना शहरांकडे जावे लागते. आर्थिक परिस्थिती, प्रवासाचा खर्च आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मर्यादा येतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच शिस्तबद्ध, दर्जेदार आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने कुरुक्षेत्र करिअर अकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे.

अकॅडमीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय नोकरीच्या संधी, अभ्यासाचे नियोजन, परीक्षेची रणनीती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मुला-मुलींसाठी अभ्यासिका आणि योग्य शैक्षणिक वातावरण निर्माण करून ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने अधिकारी घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता : मान्यवरांचा विश्वास

उद्घाटनप्रसंगी सुजितसिंह ठाकूर, धनंजय सावंत, गौतम लटके, विकास कुलकर्णी व रेवण ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना केवळ योग्य दिशा, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळण्याची गरज आहे. कुरुक्षेत्र करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होईल आणि या परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

अकॅडमीने विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयार न करता सक्षम, आत्मविश्वासू आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व घडविण्यावरही भर द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

सूरज कारंडे यांचा सन्मान

यावेळी MPSCच्या माध्यमातून मंत्रालय क्लर्क म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आसू येथील सुपुत्र सूरज कारंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकते, याचे सूरज कारंडे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहु मासाळ यांनी केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र परबत यांनी केले.

यावेळी ढगपिंपरीचे नामदेव हिवरे, रमेश गरड, बप्पाजी काळे, अशोक गरड, डॉ. नवनाथ वाघमोडे, सरणवाडीचे नारायण सांगडे, भागवत डाकवले, प्रमोद लिमकर, धनाजी गायकवाड, प्रदीप शिंदे, आसूचे उपसरपंच शशिकांत खुणे, वैजिनाथ आबा हिवरे, सुरेश कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, डॉ. सोमनाथ शिंदे, सारंग खंडागळे, योगेश हिवरे, आप्पा देवकते, रामराजे काकडे, हरिदास हावळे, भारत मेहर, गजानन वाघमारे, दादासाहेब पाटील, संभाजी काळे, नितीन गरड, दादासाहेब हिवरे, सिद्धेश्वर परबत, अनिल पवार, नानासाहेब बरडे, सुदाम करळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे, त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणारे आणि भविष्यात अधिकारी घडविण्याचे केंद्र म्हणून कुरुक्षेत्र करिअर अकॅडमीची वाटचाल निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!



Post a Comment

0 Comments