ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत संत मीरा पब्लिक स्कूलचा अंडर-१४ संघ अव्वल. धाराशिव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विजेत्या संघाची निवड. Sant Mira Public School's Under-14 team tops the taluka-level volleyball tournament.

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत संत मीरा पब्लिक स्कूलचा अंडर-१४ संघ अव्वल.

धाराशिव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विजेत्या संघाची निवड.

Sant Mira Public School's Under-14 team tops the taluka-level volleyball tournament.
Sant Mira Public School's Under-14 team tops the taluka-level volleyball tournament.

परंडा, दि. १५ (रंगोली न्युज) — Sant Mira Public School's Under-14 team tops the taluka-level volleyball tournament. परंडा शहरातील संत मीरा पब्लिक स्कूलच्या अंडर-१४ व्हॉलीबॉल संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विजेत्या संघाची धाराशिव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संत मीरा पब्लिक स्कूल येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन झाले. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग नोंदविला. चुरशीच्या सामन्यांमध्ये संत मीरा पब्लिक स्कूलच्या अंडर-१४ संघाने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, संघभावना, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजेतेपद पटकावले.

विजेत्या संघाचे नेतृत्व कॅप्टन स्वराज मिसाळ याने केले. संघात औदुंबर राऊत, आदित्य ठाकूर, वीरेन देवकर, रनंजय सद्दीवाल, कल्पेश कांबळे, राजवीर सद्दीवाल, सक्षम भुमरे, समर्थ शेरे, सोहम अनवणे यांच्यासह इतर खेळाडूंचा समावेश आहे. सर्व खेळाडूंनी सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा पोलीस मनीषा शिंदे, तानाजी गुंजाळ, प्राचार्य संतोष भांडवलकर व सर्व शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक परमेश्वर काळे यांचे मार्गदर्शन, सरावाचे नियोजन आणि खेळाडूंमध्ये निर्माण केलेली संघभावना यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देत त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फलित असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास आनंद खर्डेकर, माजी राष्ट्रीय खेळाडू बप्पाजी बकाल, तालुका क्रीडा संयोजक सचिन पाटील, क्रीडा शिक्षक महेश शिंदे, महादेव भोरे, बल्लाळर, काटकर, राम चोबे यांच्यासह संत मीरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य संतोष भांडवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना क्रीडा क्षेत्रातील शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण सराव आणि खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन शाळेचे, पालकांचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले.

तालुकास्तरीय स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर आता संत मीरा पब्लिक स्कूलच्या संघाची धाराशिव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे खेळाडू व शाळा परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही संघाने दमदार कामगिरी करत पुढील यश संपादन करावे, यासाठी शाळा परिवाराकडून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी पालक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळाडूंच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी नांगरे यांनी केले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

संत मीरा पब्लिक स्कूलच्या अंडर-१४ संघाने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, आमदार तथा उपाध्यक्ष डॉ. राहुल पाटील, सचिव डॉ. उदयसिंह पाटील, संचालक डॉ. शिल्पा पाटील व करण पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!




Post a Comment

0 Comments