ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

नरवीर तरुण गणेश मंडळा परंडा तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न. ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान; गणेश भक्तांसाठी विविध सुविधांची व्यवस्था. A blood donation camp organized by Narveer Tarun Ganesh Mandal, Paranda, concluded enthusiastically.

नरवीर तरुण गणेश मंडळा परंडा तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.

५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान; गणेश भक्तांसाठी विविध सुविधांची व्यवस्था.

A blood donation camp organized by Narveer Tarun Ganesh Mandal, Paranda, concluded enthusiastically.
A blood donation camp organized by Narveer Tarun Ganesh Mandal, Paranda, concluded enthusiastically.

परंडा, दि. १५ (रंगोली न्युज) — A blood donation camp organized by Narveer Tarun Ganesh Mandal, Paranda, concluded enthusiastically. परंडा शहरातील मंगळवार पेठ येथील नरवीर तरुण गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि. १५) हे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात तब्बल ५१ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (अण्णा) साळुंखे व परंडा नगराध्यक्ष जाकीर (भाई) सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पै. नवनाथ (आप्पा) जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल नाना देवकर, पंचायत समिती सदस्य अमोल नलवडे, अशोक गरड, ह.भ.प. नागेश महाराज मांजरे, माजी नगरसेवक तथा माजी शहरप्रमुख दत्ता महाराज रणभोर, युवासेना शहरप्रमुख वैभव पवार, माजी नगरसेवक सतीश मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

५१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मंगळवार पेठचा राजा म्हणून ओळखले जाणारे आणि परंडा शहरातील जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या नरवीर तरुण गणेश मंडळाचे यंदाचे ६६ वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच परंपरेनुसार यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त मंडळात येणाऱ्या भाविकांसाठी केळी, फळे, चहा, बिस्कीट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक उपक्रमासोबतच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले.

मंडळाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष सुरज कासार यांच्यासह भूषण रणभोर, संकेत बुलबुले, सुरज रणभोर, सुजित शिंदे, ऋषी भराटे, धीरज कासार, यश रणभोर, सचिन कासार, मयूर बुलबुले, अनंत बुलबुले, प्रसाद बुलबुले, रणजित शिंदे, गोविंद बुलबुले, पिंटू दीक्षित, आकाश बुलबुले, आदित्य बुलबुले, कुणाल बुलबुले, ओंकार कासार, अजित शिंदे, शिवशंकर स्वामी, नवीन चैतन्य, रविकिरण चैतन्य, प्रसन्न रणभोर, बालाजी बुलबुले, अमोल रणभोर, संतोष बुलबुले, राहुल बुलबुले, सागर बुलबुले, सुजल बुलबुले, अमोल भराटे, अक्षय भराटे, समाधान मुळे, संकेत चैतन्य, ऋषिकेश भातंबरेकर, ओंकार थोरबोले, हनुमंत मोरे, समर्थ बुलबुले, राहुल कडबणे, माऊली थोरबोले आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत मिळत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा नरवीर तरुण गणेश मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments