नागेश्वर गणेश मित्र मंडळाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न.
समता नगर ‘आपला दवाखाना’ पथकाकडून शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी; मोफत औषधोपचार.
![]() |
| A free general health check-up camp was successfully organized by the Nageshwar Ganesh Mitra Mandal. |
परंडा, दि. १५ (रंगोली न्यूज) — A free general health check-up camp was successfully organized by the Nageshwar Ganesh Mitra Mandal. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत कुर्डुवाडी रोडवरील निळा झेंडा चौक येथे नागेश्वर गणेश मित्र मंडळाच्या वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका ग्रामीण रुग्णालय तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’, समता नगर, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिरामध्ये समता नगर ‘आपला दवाखाना’ येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित कांबळे, नर्स शितल मगर, आरोग्य सेवक अभय खंडागळे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक उपस्थित होते. या पथकाने शिबिरासाठी आलेल्या नागरिकांची आस्थेने प्राथमिक आरोग्य तपासणी केली.
यावेळी नागरिकांची रक्तदाब (BP), प्राथमिक आजार तसेच विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान आवश्यकतेनुसार नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक उपक्रमांची जोड देण्याच्या उद्देशाने नागेश्वर गणेश मित्र मंडळाने या आरोग्य शिबिराचे आयोजन केले. उत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच गरजू रुग्णांना प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा हा उपक्रम ठरला.
आरोग्य तपासणीसाठी नागरिकांची मोठी उपस्थिती
शिबिरामध्ये परिसरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. दैनंदिन धावपळीत आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांसाठी अशा मोफत आरोग्य शिबिरांचा मोठा फायदा होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाला विधायक स्वरूप देत नागेश्वर गणेश मित्र मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे परंडा शहरासह ग्रामीण भागातून कौतुक होत आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी नागेश्वर गणेश मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी तालुका ग्रामीण रुग्णालय आणि ‘आपला दवाखाना’च्या वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!