ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ब्रम्हगाव जि.प. शाळेत नूतन शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना. सचिन राजेश गायकवाड अध्यक्ष तर ज्ञानेश्वर गवळी उपाध्यक्षपदी निवड. Reconstitution of the new School Management Committee at Brahmagaon Z.P. School.

ब्रम्हगाव जि.प. शाळेत नूतन शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना.

सचिन राजेश गायकवाड अध्यक्ष तर ज्ञानेश्वर गवळी उपाध्यक्षपदी निवड.

Reconstitution of the new School Management Committee at Brahmagaon Z.P. School.
Reconstitution of the new School Management Committee at Brahmagaon Z.P. School.

परंडा दि. १२ (रंगोली न्यूज) Reconstitution of the new School Management Committee at Brahmagaon Z.P. School. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ब्रम्हगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. १२ सप्टेंबर रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना "Reconstitution of the School Management Committee" करण्यात आली. यावेळी नूतन समितीच्या अध्यक्षपदी सचिन राजेश गायकवाड, तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिवाजी गवळी यांची निवड करण्यात आली.

शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यानुसार पालकांच्या सहभागातून नवीन समितीची निवड करण्यात आली. नूतन समितीमध्ये महादेव गोवर्धन हिंगणकर, मयूर अशोक काजळेकर, नितीन कुंडलिक ओव्हाळ, सौ. अर्चना अमोल गायकवाड, सौ. प्रियंका ज्ञानेश्वर क्षीरसागर, सौ. दीक्षा दत्तात्रय जाधव, सौ. रोहिणी सुधीर काळे आणि सौ. कोमल विशाल शिंदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. सुषमा सुभाष चव्हाण यांची निवड करण्यात आली असून मुख्याध्यापक लहु नागनाथ मासाळ यांच्यावर समितीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध

नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे, शाळेतील भौतिक सुविधा अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे तसेच पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यावर समितीचा भर राहणार आहे.

शाळेच्या विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा घेणे आणि शाळेच्या गरजांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या पालक सभेस केंद्रप्रमुख प्रकाश ठवरे, विषय शिक्षक हणुमंत कांबळे, माजी अध्यक्ष फुलचंद ओव्हाळ, माजी उपाध्यक्ष महादेव हिंगणकर, अंगणवाडी सेविका सौ. सविता येवले, अमर ओव्हाळ, दत्तात्रय जाधव, शांतीलाल ओव्हाळ यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचे उपस्थित मान्यवर व पालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नूतन समितीने प्रभावीपणे कार्य करावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!



Post a Comment

0 Comments