ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा येथील बावची विद्यालयाचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश. ... Bavchi Vidyalaya in Paranda succeeds in NMMS exam

परंडा येथील बावची विद्यालयाचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश. ..Bavchi Vidyalaya in Paranda succeeds in NMMS exam

परांडा - दि. २६) परांडा तालुक्यातील बावची विद्यालय परांडा यांनी एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण ५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०० पेक्षा जास्त गुण मिळवून १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. हा उल्लेखनीय निकाल विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साक्ष देणारा ठरला आहे.

    यावर्षीच्या निकालात विशेष उल्लेखनीय कामगिरी करत देवकर संस्कृती समाधान हिने १५० गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच सातपुते प्राची संभाजी हिने १४९ गुण मिळवून परंडा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

      विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा अहोरात्र कार्यरत आहे. विशेष मार्गदर्शन वर्ग, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक लक्ष आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम यामुळेच हे दैदिप्यमान यश संपादन करता आले आहे.

      या विद्यार्थ्यांना प्रमोद डोके व एस. एस. पाटेकर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध अध्यापनामुळे आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले आहे.

     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे तसेच प्राचार्य नारायण खैरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

Post a Comment

0 Comments