![]() |
| Jyoti Khaire honored by the District Collector as an excellent farmer |
उत्कृष्ट शेतकरी म्हणून ज्योती खैरे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान. ... Jyoti Khaire honored by the District Collector as an excellent farmer
पाचपिंपळा येथील ज्योतो खैरे यांची कृषि क्षेत्रात भरारी. ....
परंडा - दि. २५) धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथील ज्योती अनिल खैरे यांनी बी.एस्सी. पदवीधर असे उच्च शिक्षण घेऊन परंपरागत शेती करण्याच मार्ग स्वीकारला आणी कुटूंबासह स्वताचे कष्ट, जिद्द, चिकाटी आणि आधुनिक शेती पद्धतीच्या जोरावर उत्कृष्ट शेतकरी म्हणून श्री तुळजाभवानी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवामध्ये प्रगतीशील शेतकरी म्हणून धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मानाचा सन्मान प्राप्त केला आहे.
![]() |
| Jyoti Khaire honored by the District Collector as an excellent farmer |
या प्रसंगी परंडा तालुका कृषि अधिकारी नानासाहेब लांडगे, मंडळ कृषि अधिकारी फरतडे, सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती एस.एस. गायकवाड यांच्यासह परंडा तालुक्यातील मंडळ कृषि अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
ज्योती खैरे यांचे पती श्री. अनिल खैरे हे भारतीय सैन्यात कार्यरत असून देशाच्या सुरक्षेसाठी सीमारेषेवर लढत आहेत. एकीकडे पती देशरक्षणासाठी योगदान देत असताना, दुसरीकडे ज्योतीताई गावात राहून कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत शेतीही तितक्याच जिद्दीने करत शेतीच्या माध्यमातून योगदान देत आहेत.
![]() |
| Jyoti Khaire honored by the District Collector as an excellent farmer |
ज्योती खैरे या शेतीतील बहुतांश कामे स्वतः करतात. फवारणीपासून मशागतपर्यंत सर्व कामे त्या स्वतः ट्रॅक्टर चालवून करतात. मजूर आणणे-नेणे, शेतीसाठी लागणारे साहित्य वाहून नेणे तसेच तयार माल बाजारात विक्रीसाठी नेणे ही कामेही त्या स्वतः चारचाकी वाहन चालवून पार पाडतात.
शिक्षण, कुटुंब आणि शेती यांचा सुंदर समतोल साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून यश मिळवणाऱ्या ज्योती खैरे या परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषि क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com



0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!