जिद्द, मेहनत आणि आईच्या कष्टांचे फळ; डोमगावच्या निलेश मिस्किनची ससून रुग्णालयात आरोग्य सेवकपदी निवड.
![]() |
| The fruit of determination, hard work, and his mother's toil: Nilesh Miskin from Domgaon has been selected as a health worker at Sassoon Hospital. |
परंडा दि. १३ (रंगोली न्युज) – The fruit of determination, hard work, and his mother's toil: Nilesh Miskin from Domgaon has been selected as a health worker at Sassoon Hospital. संकटांशी दोन हात करत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि अथक परिश्रमाच्या बळावर यशाचे शिखर गाठणाऱ्या परंडा तालुक्यातील डोमगाव येथील निलेश बिभीषण मिस्किन याची पुण्यातील नामांकित ससून रुग्णालयात आरोग्य सेवक या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे डोमगावसह संपूर्ण परंडा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील युवकांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.
निलेशचा शैक्षणिक आणि जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्याने शिक्षणाची वाट सोडली नाही. त्याचे प्राथमिक शिक्षण डोमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण कल्याणसागर हायस्कूल, डोमगाव येथे पूर्ण झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्याने परंडा येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षणाची ओढ आणि प्रगतीची जिद्द कायम ठेवत त्याने पुण्यातील आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातून बी.एस्सी. (B.Sc.) पदवी संपादन केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही निलेशने विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियांसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. अनेक अडचणी आणि आर्थिक संकटांचा सामना करत त्याने हार मानली नाही. अखेर त्याच्या चिकाटीला यश मिळाले आणि त्याची पुण्यातील ससून रुग्णालयात आरोग्य सेवक पदावर निवड झाली.
निलेशच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे वडिलांचे अकाली निधन. सुमारे १४ वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या संकटातही निलेशने धैर्य गमावले नाही. आईच्या कष्टाची जाणीव ठेवत त्याने शिक्षण आणि करिअरची वाट अधिक जिद्दीने चालू ठेवली. कुटुंबाच्या आर्थिक अडचणी, घरातील जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता यावर मात करत त्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले.
निलेशची निवड झाल्याचे वृत्त समजताच डोमगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत त्याचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी सतीश राऊत, पप्पू मिस्किन, अंकुश काळे, आबा खैरे, राजाभाऊ खैरे, तात्या राऊत, निलेश गायकवाड, आसिफ तांबोळी, शुभम खैरे, अविनाश काळे, प्रतीक काळे, ओकार शिंदे, शुभम गणगे, श्रीकांत साबळे, सार्थक मिस्किन, केतन पोफळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
निलेशच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळविता येते, हा संदेश त्याच्या यशातून अधोरेखित झाला आहे. त्याच्या निवडीबद्दल परंडा तालुक्यातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
◼️ : आईच्या कष्टांची अखेर झाली सार्थक
निलेश मिस्किन यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार गेली अनेक वर्षे त्यांच्या आईच्या खांद्यावर होता. पतीच्या निधनानंतर कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हार न मानता दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला.
मजुरीच्या कमाईतून त्यांनी निलेशसह एक मुलगा आणि दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कुटुंबातील एका मुलीचे लग्न झाले असून दुसरी मुलगी सध्या बारावीचे शिक्षण घेत आहे. मोठा मुलगा पुण्यातील एका कंपनीत नोकरी करत आहे.
आता निलेशची पुण्यातील ससून रुग्णालयात आरोग्य सेवकपदी निवड झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक वर्षे एकहाती कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आईच्या कष्टांचे हे मोठे फळ मानले जात असून त्यांच्या खांद्यावरील आर्थिक भार आता मोठ्या प्रमाणात हलका होणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!