ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

महाडीबीटी योजनेअंतर्गत भोंजा येथे शेतकरी गटांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप. Distribution of soybean seeds to farmer groups at Bhonja under the MahaDBT scheme.

महाडीबीटी योजनेअंतर्गत भोंजा येथे शेतकरी गटांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप.

Distribution of soybean seeds to farmer groups at Bhonja under the MahaDBT scheme.
Distribution of soybean seeds to farmer groups at Bhonja under the MahaDBT scheme.

परंडा दि. १३ (रंगोली न्युज) – Distribution of soybean seeds to farmer groups at Bhonja under the MahaDBT scheme. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भोंजा येथे महाडीबीटी योजनेअंतर्गत ऑनलाइन निवड झालेल्या शेतकरी गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणित सोयाबीन बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

भोंजा हवेली येथील श्री गणेश शेतकरी गट व भूमिपुत्र शेतकरी गट या गटांमधील महिला व पुरुष शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. आगामी खरीप हंगामात दर्जेदार बियाण्यांच्या वापरातून उत्पादनवाढ साध्य व्हावी, या उद्देशाने कृषी विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी शेतकऱ्यांना बियाण्यांची पेरणीपूर्व प्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता टिकवून ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच रोग व कीड प्रतिबंधासाठी बीजप्रक्रियेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी एस. के. माळी, उप कृषी अधिकारी बी. एन. हांगे, सहाय्यक कृषी अधिकारी विनोद भाग्यवंत, आत्मा तालुका समन्वयक ए. आर. पाटील तसेच कृषी मित्र गणेश नेटके यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी, बीबीएफ (Broad Bed Furrow) पद्धतीद्वारे पेरणीचे फायदे, जलसंधारण आणि पीक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन पिकांच्या वाढीस चालना मिळते, असेही यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास अजित नेटके, प्रकाश कुलकर्णी, सुब्राव मोरे, अमोल नेटके, नंदकुमार मोरे, हनुमंत कोंडलकर, देविदास सरवदे, ओम नेटके, बाळासाहेब मांजरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी लाभार्थी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत करत खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments