सेवापूर्ती सोहळ्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; कल्याणसागर विद्यालयात उत्साहाचे वातावरण.
![]() |
| Meritorious students felicitated alongside a ceremony marking the completion of service; an atmosphere of enthusiasm at Kalyansagar Vidyalaya. |
परंडा, दि. ३० (रंगोली न्यूज) : Meritorious students felicitated alongside a ceremony marking the completion of service; an atmosphere of enthusiasm at Kalyansagar Vidyalaya. परंडा येथील कल्याणसागर समूहाच्या कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक महादेव नरुटे तसेच सिद्धार्थ विद्यालय, देवगावचे मुख्याध्यापक निर्मलकुमार गांधले यांच्या नियत वयोमानानुसार सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याच कार्यक्रमात चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर हे होते. त्यांच्या हस्ते सेवापूर्ती झालेल्या महादेव नरुटे व निर्मलकुमार गांधले यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अध्यक्षीय भाषणात सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष म्हणून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांप्रती असलेली जबाबदारी आपण नेहमीच प्रामाणिकपणे पार पाडली आहे. भविष्यातही कोणत्याही आजी-माजी विद्यार्थ्याला किंवा त्यांच्या पालकांना शैक्षणिक, सामाजिक अथवा आर्थिक अडचण निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी आपण कायम तत्पर राहू. विविध उच्च पदांवर कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी आपल्या संपर्कात असून, त्यांच्या माध्यमातूनही समाजासाठी अधिक चांगले कार्य करण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सेवापूर्ती झालेल्या शिक्षकांचा भावनिक सत्कार केला. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
यावेळी नीट (NEET) परीक्षेत ६५६ गुण मिळवून यश संपादन करणारा विद्यार्थी उत्कर्ष कोठावळे याचाही विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्याने विद्यार्थ्यांनी स्वतःतील उणिवा ओळखून त्यावर सातत्याने मेहनत घेतल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला.
सत्कारमूर्ती महादेव नरुटे व निर्मलकुमार गांधले यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळातील अनुभव सांगत सर्व सहकारी, विद्यार्थी, पालक आणि संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मनोगतामुळे उपस्थित वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक काशीद, सहशिक्षक पडघन, पवार, गरड, रहमत शेख, चामवड, शेरे तसेच मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी, पालक, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद भोसले यांनी केले, सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश पवार यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!