ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सरस्वती प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; इयत्ता सातवीत चौदा पैकी तेरा विद्यार्थी पात्र, चौथीतही उल्लेखनीय कामगिरी. Saraswati Primary School achieves resounding success in the scholarship examination; thirteen out of fourteen students from Class 7 qualified, with notable performance in Class 4 as well.

सरस्वती प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; इयत्ता सातवीत चौदा पैकी तेरा विद्यार्थी पात्र, चौथीतही उल्लेखनीय कामगिरी.

Saraswati Primary School achieves resounding success in the scholarship examination; thirteen out of fourteen students from Class 7 qualified, with notable performance in Class 4 as well.
Saraswati Primary School achieves resounding success in the scholarship examination; thirteen out of fourteen students from Class 7 qualified, with notable performance in Class 4 as well.

परंडा, दि. २८ (रंगोली न्यूज) : Saraswati Primary School achieves resounding success in the scholarship examination; thirteen out of fourteen students from Class 7 qualified, with notable performance in Class 4 as well. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, परंडा येथील कल्याणसागर समूहाच्या सरस्वती प्राथमिक शाळेने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चौदा पैकी तेरा विद्यार्थी पात्र ठरले असून, दोनशेहून अधिक गुण मिळविणारे पाच विद्यार्थी देत शाळेने तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची छाप पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रावी व्यवहारे हिने तीनशे पैकी २२६ गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ समर्थ सायकर – २२२, श्रेया बारसकर – २१६, सुरज गोफने – २१६, वैभवी मुळीक – २०६, सुरभी दीक्षित – १९४, जयश्री कसबे – १८८, अपेक्षा गरड – १८६, प्रणव कदम – १८६, कल्याणी गोफने – १८२, अशोक आगरकर – १८०, शिवराज खोबरे – १७८ आणि आलिया पटेल – १६० गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत अंश लांडगे याने तीनशे पैकी २६६ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ओम गोफणे – १९६, रुकया करपुडे – १६४ आणि अभिमन्यु देशमुख – १२६ गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुजितसिंह ठाकूर, सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, मार्गदर्शक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, सुबोधसिंह ठाकूर आणि किरण गरड यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामागे शिक्षकांचे परिश्रमही तितकेच मोलाचे ठरले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना सचिन शिंदे, रजनी कुलकर्णी आणि मेघा काशीद यांचे मार्गदर्शन लाभले. तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना अमोल कोकाटे आणि भारत थिटे यांनी योग्य मार्गदर्शन करून यशाची वाट दाखविली.

शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे आणि शिक्षकांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाचे परंडा शहरासह संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, सरस्वती प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments