ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात; गरजू विद्यार्थ्यांना वही-पेनचे वाटप. Lokshahir Annabhau Sathe's birth anniversary celebrated with enthusiasm; notebooks and pens distributed to needy students.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात; गरजू विद्यार्थ्यांना वही-पेनचे वाटप. 

Lokshahir Annabhau Sathe's birth anniversary celebrated with enthusiasm; notebooks and pens distributed to needy students.
Lokshahir Annabhau Sathe's birth anniversary celebrated with enthusiasm; notebooks and pens distributed to needy students.

परंडा, दि. १ (रंगोली न्यूज): Lokshahir Annabhau Sathe's birth anniversary celebrated with enthusiasm; notebooks and pens distributed to needy students. परंडा शहरातील माळी गल्ली, मंगळवार पेठ येथे क्रांतिसूर्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी नगरसेवक वाजिद दखनी, बब्बू जिनेरी, राहुल बनसोडे, शरीफ तांबोळी, सत्तारभाई पठाण, तनवीर मुजावर, इरफानभाई शेख, तानाजी शिंदे, संजय घाडगे, कय्युम तुटके, संजय श्रीहरी नाईकवाडी, नंदू शिंदे, आप्पाराव बनसोडे, संजय शिंदे, जुबेर पठाण, शिवाजी मेहर, वैभव पवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन जयंत शिंदे, घनश्याम शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments