ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंड्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन; भाजपा व रिपाईतर्फे कार्यक्रम उत्साहात

परंड्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन; भाजपा व रिपाईतर्फे कार्यक्रम उत्साहात

Greetings at various places in Parandya on the occasion of the birth anniversary of the democrat Annabhau Sathe and the death anniversary of Lokmanya Tilak
Greetings at various places in Parandya on the occasion of the birth anniversary of the democrat Annabhau Sathe and the death anniversary of Lokmanya Tilak

परंडा, दि. १ (रंगोली न्यूज): Greetings at various places in Parandya on the occasion of the birth anniversary of the democrat Annabhau Sathe and the death anniversary of Lokmanya Tilak संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त परंडा शहरात विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

भाजपा संपर्क कार्यालयात अभिवादन

परंडा येथील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, सुखदेव टोंपे, डॉ. अमोल गोफणे, धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, अमोल केमदारणे, सुजित परदेशी, तानाजी घोडके, रामदास गुडे, प्रमोद लिमकर, रणजित मिस्कीन, जयंत सायकर, धनंजय काळे, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, मिलिंद शिंदे, सिध्दीक हन्नुरे, आप्पा मदने, संतोष गायकवाड, अमर ठाकूर, जयंत भातलवंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे जयंती साजरी

परंडा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीरदादा सुरवसे, तालुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे, बापू हावळे, भास्कर ओव्हाळ, भारत धेंडे, गोवर्धन शिंदे, शाम गायकवाड, बापू लोंढे, किशोर वाघचौरे, सुब्राव लोंढे पाटील, संपत लोंढे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समाजप्रबोधनातील योगदानाला अभिवादन केले. त्यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करून सामाजिक एकात्मता दृढ करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

परंडा शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी असून, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments