श्री शिवाजी महाविद्यालय, परंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
![]() |
| The birth anniversary of Lokshahir Annabhau Sathe was celebrated with enthusiasm at Shri Shivaji Mahavidyalaya, Paranda. |
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर अंकिता गटकुळ, आलिया मुजावर, वैष्णवी गोडगे आणि अंकिता यादव या विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य आणि समाजप्रबोधनातील योगदानावर प्रभावी मनोगते व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. एस. एन. जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीच्या माध्यमातून शोषित, वंचित तसेच कष्टकरी वर्गाच्या व्यथा समाजासमोर कशा मांडल्या यावर सविस्तर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोपात गोरख मोरजकर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. तसेच सोशल मीडियावरील कोणतीही माहिती सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय पुढे पाठवू नये, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
जयंतीनिमित्त महाविद्यालयात विशेष ‘वाचन उपक्रम’ आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कथा, कादंबऱ्या आणि साहित्याचे वाचन करून त्यांच्या साहित्यसेवेला अभिवादन केले.
याप्रसंगी प्रा. माने ए. एस., प्रा. गणेचारी ए. वाय., प्रा. शेख ए. वाय. यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिपाले आर. व्ही. यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!