ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिल्हा परिषद प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा उत्साहात संपन्न. A speech competition was held with great enthusiasm at the Zilla Parishad School to mark the death anniversary of Lokmanya Tilak and the birth anniversary of Anna Bhau Sathe.

जिल्हा परिषद प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा उत्साहात संपन्न.

A speech competition was held with great enthusiasm at the Zilla Parishad School to mark the death anniversary of Lokmanya Tilak and the birth anniversary of Anna Bhau Sathe.
A speech competition was held with great enthusiasm at the Zilla Parishad School to mark the death anniversary of Lokmanya Tilak and the birth anniversary of Anna Bhau Sathe.

परंडा, दि. २ (रंगोली न्युज): A speech competition was held with great enthusiasm at the Zilla Parishad School to mark the death anniversary of Lokmanya Tilak and the birth anniversary of Anna Bhau Sathe. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून किसन शेलार व माजी सैनिक लक्ष्मण बारसकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा, कार्याचा व समाजासाठीच्या योगदानाचा आढावा आपल्या भाषणातून मांडला. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे नियोजन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब बल्लाळ यांनी केले, तर नामदेव पखाले यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मीनाक्षी मुंडे, गीतांजली मंडलिक यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments