ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या माजी सैनिक विभागाच्या नियुक्त्या जाहीर; परंड्यात पदाधिकाऱ्यांचा गौरव. Appointments for the Ex-Servicemen Wing of the Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) announced; office-bearers felicitated in Paranda.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या माजी सैनिक विभागाच्या नियुक्त्या जाहीर; परंड्यात पदाधिकाऱ्यांचा गौरव.

Appointments for the Ex-Servicemen Wing of the Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) announced; office-bearers felicitated in Paranda.
Appointments for the Ex-Servicemen Wing of the Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) announced; office-bearers felicitated in Paranda.

परंडा, दि. २ (रंगोली न्युज): Appointments for the Ex-Servicemen Wing of the Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) announced; office-bearers felicitated in Paranda. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या माजी सैनिक विभागाच्या वतीने परंडा तालुक्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम शनिवारी (दि. २ ऑगस्ट) शासकीय विश्रामगृह, परंडा येथे उत्साहात पार पडला. माजी सैनिक विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी राऊत यांच्या मान्यतेने आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील माजी सैनिक संघटनेला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

कार्यक्रमास पक्षाचे जिल्हा सचिव सुहास ठोंगे, परंडा तालुकाध्यक्ष किरण करळे, माजी सैनिक विभागाचे तालुकाध्यक्ष सुरेश कुंभार, युवक तालुकाध्यक्ष प्रवीण गरड, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष दशरथ चाबुकस्वार, मेजर मारुती कांबळे तसेच माजी सैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी सैनिक विभागाच्या तालुका कार्यकारिणीमध्ये पुढील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. बबन पाटील यांची माजी सैनिक तालुका उपाध्यक्ष, लक्ष्मण बारसकर यांची माजी सैनिक तालुका कार्याध्यक्ष, बाळू हावळे यांची माजी सैनिक तालुका सरचिटणीस तर गोकुळदास शिंदे यांची माजी सैनिक तालुका उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी सैनिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत संघटना मजबूत करण्यासाठी व माजी सैनिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments